डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजीओथेरेपीच्या ७० विद्यार्थ्यांना पदवी प्रदान

जळगाव (प्रतिनिधी) : डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपी महाविद्यालयाचा पदवी प्रदान सोहळा शनिवारी ४ ऑक्टोबर रोजी जल्लोषात पार पडला. या सोहळ्यात ७० विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पदवी प्रदान करण्यात आली.
डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजीओथेरेपी महाविद्यालयाचा पदवी प्रदान सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, डीएम कार्डीओलॉजीस्ट डॉ. वैभव पाटील, वैद्यकीय महाविद्यालयाचे संचालक डॉ. एन. एस. आर्विकर, रजीस्ट्रार प्रमोद भिरूड, फिजीओथेरेपी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयवंत नागूलकर, महाविद्यालयाचे प्रशासकीय अधिकारी राहूल गिरी, डॉ. चित्रा मृदधा, डॉ. अमित जैस्वाल, डॉ. अनुराग हे उपस्थित होते.
समारंभाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते धन्वंतरी पूजन आणि दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत कठोर परिश्रम आणि रूग्णांची प्रामाणिक सेवा करण्याचा सल्ला दिला. प्रास्ताविक प्राचार्य डॉ. जयवंत नागूलकर यांनी केले. या कार्यक्रमात ७० विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. तसेच प्रथम आलेले सुवर्णपदक प्राप्त डॉ. ज्योत सचदेव, रौप्य पदक प्राप्त द्वितीय डॉ. सुजय मानकर, कास्य पदक प्राप्त तृतीय खुशी नवाल यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
यशस्वी विद्यार्थ्यांनी त्यांच्या शैक्षणिक प्रवासाविषयी मनोगत व्यक्त केले. तसेच आपल्या पाल्याचा सत्कार होत असलेला पाहून पालकांच्या डोळ्यात आनंदाश्रु तरळले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी हॅट उडवित पदवी प्रदान सोहळ्याचा जल्लोष केला. पालकांपैकी योगेश पाटील यांनी याप्रसंगी महाविद्यालयातील शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन आणि कठोर परिश्रम यासाठी आभार मानले. अंतिम वर्षातील आयोजक बॅच ’अभ्युदय’ च्या विद्यार्थ्यांनी या संपूर्ण कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले.
सूत्रसंचालन महेक करडा आणि समिक्षा खाडिलकर, सानिका गायकवाड आणि कलश शर्मा, चैत्राली वानखेडे आणि अंशिता वर्मा, लची अत्तर्डे आणि सुमेधा भावसार, श्रुती भुत आणि दिव्या झांबरे, मदिहा भुरानी आणि सेजल जैन, स्वर्धा पाटील आणि धम्मप्रिया अडकाने यांनी केले.




