भोरगाव सकल लेवा पंचायत भुसावळ शाखेचा मेळावा, सुची प्रकाशन सोहळा

जळगाव (प्रतिनिधी): भोरगाव सकल लेवा पंचायत भुसावळ शाखे तर्फे घटस्फोटीत, विधवा, विधुर, प्रौढ, शेतकरी, अपंग, यांचा व नवयुवकयुवतींचा मेळावा व सुची प्रकाशन सोहळा उत्साह साजरा झाला. भोरगाव लेवा पंचायत भुसावळ शाखेचे घटस्फोटितांच्या मेळाव्याचे सलग १५ वे वर्ष होते.
या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री रक्षाताई खडसे, राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री आमदार संजय सावकारे हजर होते. तसेच माजी आमदार दिलीप भोळे, जळगावचे माजी महापौर विष्णुभाऊ भंगाळे, माजी खासदार डाॅ. उल्हास पाटील हजर होते. कुटुंबनायक ललित पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाची सुरुवात झाली.
केंद्रीय मंत्री रक्षा ताई खडसे यांनी आपले विचार मांडताना सांगितले की, पुनर्विवाहेच्छुक मुलामुलींसाठी असे मेळावे आवश्यक आहेत. हा एक अतिशय चांगला उपक्रम भोरगांव पंचायत राबवत आहे. एकजुटीने काम केले तर समस्या सुटतातच. आणि अशा कार्यक्रमाला आमचा हातभार लागतो हे आम्ही आमचे भाग्य समजतो, असे बोलुन त्यांनी भोर गाव लेवा पंचायती भुसावळ च्या कामाची वाखाणणी केली. राज्य मंत्री संजय सावकारे यांनी सांगितले की, आज भारताची संस्कृती सर्व दुर आदर्श समजली जाते पण हल्ली घटस्फोटाच्या वाढत्या प्रमाणामुळे पुनर्विवाहाची संख्या वाढली आहे. आईवडीलांच्या मुलांच्या संसारातील खूप जास्त हस्तक्षेपामुळे समस्या वाढत आहेत, भोरगाव लेवा पंचायत सामुपदेशन करून घटस्फोट टाळण्यासाठी प्रयत्न करतात ही चांगली गोष्ट आहे.
प्रास्ताविकात शाखा प्रमुख सुहासद चौधरी भुसावळ शाखेच्या कामकाजाची माहिती दिली. दरवर्षी या मेळाव्यामार्फत 4 ते 5 विवाह जुळतातच. यांनतर ज्यांनी ज्यांनी कार्यक्रमाला मदत केली त्यांचे सत्कार करण्यात. कार्यक्रमाच्या चेअरमन आरती चौधरी यांनी आपले विचार व्यक्त करताना सांगितले की, घटस्फोटीतांची संख्या दरवर्षी वाढतेय पण या मेळाव्याच्या माध्यमातून लग्न जमले की आनंद होतो. विवाहपूर्व सामुपदेशन भोरगांव पंचायत तर्फे विना शुल्क केले जाते, त्याचा फायदा समाज बांधवांनी घ्यावा कारण आज ती काळाची गरज आहे. व त्यामुळे घटस्फोटाची समस्या निश्चितच कमी होईल.
15 युवकांनी दिला परिचय
नंतर युवकयुवतींनी परीचय दिला. त्यामधे जळगाव, पुणे, नाशिक, वापी, मुंबई, या ठीकाणचे युवकयुवती व पालक उपस्थित होते. सुमारे 15 युवकांनी परिचय दिला. मुलींची माहीत देण्यात आली. आभार प्रदर्शन सुभाष भंगाळे यांनी केले. याप्रसंगी भोरगाव लेवा पंचायत भुसावळ शाखेचे शमहेश फालक,आर. जी. चौधरी, परिक्षित ब-हाटे, हरीष फालक, शरद फेगडे, मंगला पाटील, अरुण चौधरी, संध्या वराडे, अनिल वारके, संजय पाटील,धीरज पाटील,अजय पाटील, धनंजय पाटील हजर होते. सुत्रसंचलन वर्षा लोखंडे यांनी आपल्या सुंदर शब्दात केले. तसेच मनोज जावळे, अशोक कोळी, दिनेश राणे, नितीन ब-हाटे, जगदीश फिरके यांचे अनमोल सहकार्य लाभले. या प्रसंगी जळगावहून अशोक चौधरी, बी. एल. ब-हाटे, नीला चौधरी, शांताराम गुरूजी पाटील, वासू इंगळे, सुधीर गंगाधर पाटील, प्रमोद नेमाडे, किरण महाजन, निळकंठ भारंबे, दिपक धांडे, दिनेश भंगाळे, अँड. बोधराज चौधरी, सुधीर बेंडाळे, प्रकाश चौधरी आदी उपस्थित होते.




