क्राईमजळगावताज्या बातम्यामहाराष्ट्रराष्ट्रीय-राज्यसमस्या

जळगाव जुन्या वादातून तरुणाचा निर्घृण खून

काही तासातच पोलिसांनी संशयित आरोपीच्या मुसक्या आवळल्या

जळगाव (प्रतिनिधी) : जुना वाद उफाळून आल्याने दोन कुटुंबांमध्ये तुंबळ राडा झाला. यात २७ वर्षीय नाना उर्फ ज्ञानेश्वर भिका पाटील याचा निर्घृण खून करण्यात आला. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. या तरुणाच्या खून प्रकरणातील संशयित आरोपीच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांच्या पथकाला काही तासातच यश आले आहे. योगेश संतोष पाटील उर्फ पिंटू (२७, रा. कासमवाडी, जळगाव) असे अटक संशयित आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील कासमवाडी परिसरात गुरुवारी मध्यरात्री जुना वाद उफाळून आल्याने दोन कुटुंबांमध्ये तुंबळ राडा झाला. या वादात नाना उर्फ ज्ञानेश्वर भिका पाटील (२७) या तरुणावर दोन तरुणांनी धारधार शस्त्राने तीन वार केले. या हल्ल्यात ज्ञानेश्वरच्या पोटावर, डाव्या मांडीवर व अंगावर वार झाल्याने त्याचे मूत्रपिंड फाटले. गंभीर जखमी अवस्थेत त्याला तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेण्यात आले, त्यानंतर खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, हल्ल्यानंतर मारेकरी घटनास्थळावरून पसार झाले होते.

नशिराबाद परिसरातून शिताफीने अटक


घटनेनंतर रुग्णालयात नातेवाईकांची व परिसरातील नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. त्यामुळे एमआयडीसी पोलिसांनी तत्काळ रुग्णालयात जाऊन बंदोबस्त वाढवला. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल करून संशयित आरोपींचा तपास सुरु केला होता. अखेर अवघ्या काही तासांत पोलिसांनी संशयित आरोपीआला नशिराबाद परिसरातून शिताफीने अटक केली आहे.

यांनी केली कारवाई


ही कारवाई जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उप विभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या पथकातील पोह नितीन बाविस्कर, पोना किशोर पाटील, पोकॉ छगन तायडे, रवींद्र कापडणे यांनी केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button