आरोग्यआर्थिकजळगावताज्या बातम्यामहाराष्ट्रयोजनाराष्ट्रीय-राज्यशासकीयसामाजिक
जिल्हाधिकारी कार्यालयात ६ ऑक्टोंबर रोजी लोकशाही दिन

जळगाव (प्रतिनिधी) : दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी आयोजित करण्यात येणारा जिल्हास्तरीय लोकशाही दिन सोमवार, ६ ऑक्टोंबर रोजी सकाळी १०.३० वाजता जिल्हाधिकारी कार्यालय आवार, अल्पबचत सभागृह, जळगाव येथे आयोजित करण्यात आल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी, जळगाव यांनी दिली आहे.
नागरिकांनी यापूर्वी तालुका लोकशाही दिनात अर्ज केला असेल आणि सदर अर्जासंबंधी एक महिन्याच्या आंत तालुकास्तरावरुन कोणतेही उत्तर मिळाले नसेल अशाच व्यक्तीनी तक्रारी घेऊन लोकशाही दिनी उपस्थित रहावे, असे आवाहन वैशाली चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी, जळगाव यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.




