गिरणा धरणात पाण्याची आवक वाढली

परिसरात समाधान; पेरण्यांना सुरुवात
जळगाव (प्रतिनिधी) – सध्या जळगाव व नाशिक जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरु आहे. त्यामुळे गिरणा धरणात पाण्याची आवक वाढली आहे. त्यामुळे परिसरात समाधान व्यक्त होत आहे. गिरणा धरणातून जळगाव तालुका व परिसरात पाण्याचा पुरवठा होतो. त्यामुळे परिसरातील पाण्याचा प्रश्न सुटलेला आहे.
गिरणा धरणात पावसाळा सुरु होण्यापूर्वी साधारण २१ टक्के जलसाठा शिल्लक होता. आता पावसाळ्याला सुरु वात झाल्यापासून गिरणा धरणात पावसाच्या पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात सुरु झाली आहे.
गिरणा धरणात आतापर्यंत एकुण ४१ टक्के जलसाठा आहे, अशी माहिती संबंधित कर्मचाऱ्यांकडून मिळाली. चणकापुर, पुनद धरणातुन पावसाच्या पाण्याची गिरणा धरणात आवक सुरु आहे. गिरणा धरण भरत असल्याने शेतकऱ्यांसह नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. पाऊस नियमित राहिला तर पुढील आठवड्यात जलसाठा निम्यावर जाईल, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.