रावेरच्या मॅक्रो व्हिजन अकॅडमीचा अंडर-१७ रिले स्पर्धेत यश

उल्लेखनीय कामगिरी करत मुलींनी पटकावला दुसरा क्रमांक
रावेर (प्रतिनिधी) : व्ही. एस. नाईक कॉलेज, रावेर येथे नुकत्याच झालेल्या अंडर-१७ रिले स्पर्धेत मॅक्रो व्हिजन अकॅडमीच्या मुलींनी उल्लेखनीय कामगिरी करत दुसरा क्रमांक पटकावला. या स्पर्धेत इयत्ता नववीच्या साक्षी सूर्यवंशी, राशी पाटील आणि इयत्ता दहावीच्या प्राजक्ता तायडे, कृष्णाली राजपूत यांनी उत्कृष्ट टीमवर्क आणि वेग दाखवत सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
“रिले ही फक्त शर्यत नाही, ती विश्वास, एकता आणि वेगाची साखळी आहे.”
“साथीदाराचा हात पुढे येतो तेव्हा प्रत्येक पावलात जिंकण्याची उमेद जागते.”
या यशामागे वेलनेस टीचर राहुल इंगळे यांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले. त्यांच्या परिश्रमासोबत विद्यार्थिनींची जिद्द आणि मेहनत यामुळे हा यशाचा मुकूट शक्य झाला.शाळेचे व्यवस्थापक किरण दुबे व शाळेचे मुख्याध्यापक जनार्दन धनगर यांनी विजेत्या विद्यार्थिनींचे मनःपूर्वक अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच शिक्षक वृंद व कर्मचारी वर्ग यांनीही विजेत्या विद्यार्थिनींना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहे.
शाळेचे चेअरमन श्रीराम पाटील, सेक्रेटरी स्वप्नील पाटील आणि जॉइंट सेक्रेटरी प्रमोद पाटील, शाळेच्या शैक्षणिक संचालिका वनिता पाटील यांनी विजेत्या विद्यार्थिनींचे कौतुक व आनंद व्यक्त केला आहे. तसेच शाळेचे उपाध्यक्ष ॲड. प्रवीण पासपोहे, खजिनदार विजय गोटीवांले, डायरेक्टर विनायक पाटील, धनराज चौधरी यांनी विद्यार्थिनींना खूप खूप शुभेच्छा दिल्या.




