मॅक्रो व्हिजन शाळेत स्वातंत्र्य दिनाचा उत्सव भव्यदिव्य वातावरणात साजरा

रावेर (प्रतिनिधी) : येथील मॅक्रो व्हिजन शाळेत १५ ऑगस्ट रोजी ७९ वा स्वातंत्र्य दिन सोहळा देशभक्तीच्या ओलाव्यात व मोठ्या उत्साहात पार पडला. सकाळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते राष्ट्रध्वजाचे पूजन व विधिवत ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर सर्वांनी राष्ट्रगीत सादर करून भारतमातेप्रति अभिवादन केले.
या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून भास्कर महाजन (अंबिका व्यायाम शाळा अध्यक्ष रावेर) यांनी उपस्थिती लावली. स्वातंत्र्यदिनानिमत्त विद्यार्थ्यांनी परेड, देशभक्तिपर गीत, नृत्य व भाषणे आदी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे स्वातंत्र्य सैनिकांच्या त्यागाची आठवण करून दिली. कार्यक्रमाचे अध्यक्षीय भाषण करताना अध्यक्षांनी स्वातंत्र्याच्या अमूल्य वारशाचे जतन करण्याचे आणि विद्यार्थ्यांनी सजग नागरिक होण्याचे आवाहन केले.
“स्वातंत्र्य ही केवळ भेट नाही, तर त्याची जपणूक करण्याची जबाबदारी आहे. चला, आपण ज्ञान, शिस्त आणि संस्कारांनी देशाचे भविष्य उज्ज्वल करूया.”अशा शब्दात शाळेच्या संचालिका सौ वनिता पाटील मॅडम यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले.
सूत्रसंचालन इयत्ता नववीच्या इच्छा महाजन व भाविका कुयटे या विद्यार्थिनींनी केले. शाळेचे व्यवस्थापक किरण दुबे यांचे या कार्यक्रमाला मार्गदर्शन लाभले. तसेच कार्यक्रमाच्या शेवटी मुख्याध्यापक जनार्दन धनगर (जे.डी. सर) यांनी आभार प्रदर्शन करत शिक्षकवर्ग, विद्यार्थी, पालक आणि उपस्थित मान्यवरांचे आभार मानले. ‘भारत माता की जय’ व ‘वंदे मातरम्’च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.
शाळेचे चेअरमन श्रीराम पाटील, सेक्रेटरी स्वप्नील पाटील आणि जॉइंट सेक्रेटरी प्रमोद पाटील, शाळेच्या शैक्षणिक संचालिका वनिता पाटील यांनी विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच शाळेचे उपाध्यक्ष ॲड. प्रवीण पासपोहे, खजिनदार विजय गोटीवांले, डायरेक्टर धनराज चौधरी यांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे कौतुक करून स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच राजेंद्र चौधरी व ॲड. सागर पाचपोहे व त्यांच्या पत्नी रंजिता पाचपोहे यांनी ही कार्यक्रमाला उपस्थिती लावली व विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.




