भ.नि.नि (जीपीएफ) खाते उतारे एका क्लिकवर उपलब्ध

जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध, महिनाभराच्या आत त्रृटी कळविण्याचे आवाहन
जळगाव (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद जळगाव अंतर्गत ऑनलाईन कामकाजावर अधिकाधिक भर दिला जात असून त्याचाच एक भाग म्हणून शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे भविष्य निर्वाह निधीचे सन 2024-25 चे खाते उतारे हे जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. कर्मचा-यांना एका क्लिकवर हे खाते उतारे उपलब्ध होणार आहे.
जिल्हा परिषदेच्या अर्थ विभागाअंतर्गत कार्यरत भविष्य निर्वाह निधी शाखेकडून हे खाते उतारे ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात आले आहेत. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी, मिनल करनवाल यांनी जिल्हा परिषदेचे काम हे पारदर्शक पद्धतीने व जलद गतीने होण्यासाठी ऑनलाईन प्रणालीद्वारे कामकाज करण्यावर भर दिला आहे. यात ई-ऑफिस प्रणालीचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला असून ‘पेपरलेस वर्क’ याकडे जिल्हा परिषद जळगावची वाटचाल सुरू आहे. त्याच अनुषंगाने जिल्हा परिषद जळगाव संकेतस्थळ नवीन रूपात सुरू करण्यात आले आहे.
जिल्हा परिषदेच्या अंतर्गत कार्यरत शिक्षक व शिक्षकेतर अशा सुमारे सात हजारांवर कर्मचारी यांचे भविष्य निर्वाह निधीचे खाते उतारे हे जिल्हा परिषदेच्या http://zp jalgaon.gov. In या न्न्संकेतस्थळावर आयटी सेलमार्फत दि.24/09/2025 रोजी उपलब्ध करण्यात आले आहे. खाते उतारे संकेतस्थळावर अद्यावत करण्याकामी मुख्य लेखा व वित्त अधिकारी विनोद चावरीया, लेखाधिकारी अशोक तायडे, सहाय्यक लेखाधिकारी किरण पाराशर, कनिष्ठ लेखाधिकारी गुलाबराव आसाराम पाटील, आयटी सेल प्रमुख प्रशांत होले यांच्या मार्गदर्शनखाली भ.नि.नि शाखेतील कर्मचारी यांनी परीश्रम घेतले.
खाते उतारा कसा पहावा
जिल्हा परिषद जळगावच्या संकेतस्थळावर ई- प्रशासन या सेक्सनमध्ये जावून पीटी किंवा अदर किंवा एम.के यानुसार कर्मचारी प्रवर्ग निवडून आपला खाते उतारा क्रमांक टाकून एका क्लिकवर सन 2024-25 या वर्षाचा पूर्ण हिशेबाचा खाते उतारा पीडीएफ स्वरूपात संबधित कर्मचारी यांना मिळणार आहे. दरम्यान, या खाते उतारा-यात काही त्रृटी असल्यास संबधितांनी कार्यालय प्रमुख यांच्या शिफारशीने भविष्य निर्वाह निधी शाखेत एका महिन्यात कळवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.




