
रावेर (प्रतिनिधी) : रावेर तालुक्यातील ऐनपूर येथील स्वामी अकॅडमी शाळेत आज जागतिक हृदय दिन साजरा करण्यात आला. हा कार्यक्रम शाळेचे मुख्याध्यापक मनु अँटोनी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला.
या कार्यक्रमाचे मुख्य संचालन व आयोजन अनुपमा पाटील यांनी केले. यानिमित्ताने इयत्ता चौथी व पाचवीतील विद्यार्थ्यांनी विविध पोस्टर, प्रकल्प सादर करून दाखविले. तसेच या विद्यार्थ्यांची ऐनपूर गावातून बस स्टँड, बाजार, सरदार वल्लभभाई चौक, शॉपिंग मॉल्स, मेन रोड आदी परिसरातून रॅली काढण्यात आली. प्रस्तावित अनिकेत महाजन यांनी आपले विचार मांडले.
हृदयसंबंधित केले समुपदेशन
अनुपमा पाटील व विद्यार्थ्यांनी हृदय आणि हृदयसंबंधित आजार व काळजी या मुद्यांवर जनमाणसांना समुपदेशन केले. यामध्ये विश्वा पाटील, स्नेहल पाटील, तन्वी पाटील, हिमांशी माळी, अवनी पाटील, जान्हविका तायडे, लव्य पाटील, नैतिक महाजन, गौरव पाटील, प्रिन्स मेढे, देवांश पाटील, स्वरा महाजन या विद्यार्थ्यांनी गावातून ठिक ठिकाणी आपापली भाषणे सादर केली.
रॅलीदरम्यान मुख्याध्यापक मनु अँटोनी, अनिकेत महाजन यांनी मार्गदर्शन केले. यशस्वीतेसाठी अनुपमा पाटील यांनी परिश्रम घेतले.




