स्वामी विवेकानंद विद्यालयात दिंडी सोहळा उत्साहात

विविध सामाजिक संदेशासह विद्यार्थ्यांनी केले समाज प्रबोधन
रावेर (प्रतिनिधी )- स्वामी विवेकानंद विद्यामंदिर, रावेर येथे आषाढी एकादशी निमित्त भव्य दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या पवित्र सोहळ्याला वारकरी संप्रदायाचे मान्यवर वारकरी राजेंद्र निवृत्ती सनंन्से हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष रवींद्र पवार, मनीषा पवार, संचालिका डॉ. सुखदा पवार, संचालक पुष्पक पवार यांची प्रमुख उपस्थिती लाभली. या भव्य सोहळ्याची सुरुवात स्वामी विवेकानंद विद्यामंदिर परिसरातून झाली. विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषेत ढोल-ताशांच्या गजरात आणि भगव्या पताकांसह भक्तिभावाने दिंडी साकारली.
विद्यार्थ्यांनी विविध नृत्याविष्कार आणि सांस्कृतिक सादरीकरणातून समाजप्रबोधनाचे संदेश दिले. साक्षरतेविषयी जनजागृती, पाणी वाचवा, पावसाचे पाणी साठवा, तसेच वारकरी संप्रदायाचा उत्सवमूर्ती आनंद सोहळा – हे विषय केंद्रस्थानी होते. तसेच शहरातून भव्य दिंडी सोहळ्याची मिरवणूक काढण्यात आली यात आकर्षण म्हणुन अनेक देखाव्याचा समावेश करण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले असा दिव्य सोहळा ‘न भूतो न भविष्यती’ ठरला. .
कार्यक्रमाला शाळेच्या प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका धांडे मॅडम, मुख्याध्यापक राजू पवार, कीर्ती निळे, इंग्लिश मीडियमचे मुख्याध्यापक रतिष मौन व अनिता पाटील यांची उपस्थिती व मार्गदर्शन लाभले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा संपूर्ण कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.