स्वामी एज्युकेशनल ग्रुप आयोजित गरबा दांडिया नाईट जल्लोषात

रंगतदार वातावरणात बक्षिस वितरण सोहळा साजरा
रावेर (प्रतिनिधी) : स्वामी एज्युकेशनल ग्रुप आयोजित ‘स्वामी गरबा दांडिया नाईट 2025’ हा दोन दिवस चाललेला सांस्कृतिक कार्यक्रम प्रचंड उत्साहात आणि रंगतदार वातावरणात संपन्न झाला. पहिल्या दिवशी २६ सप्टेंबरपासून सुरू झालेला स्पर्धा आयोजनाच्या कार्यक्रमाला नारीशक्ती पाहुणे म्हणून कांता बोरा, रिया पाटील, भारती गनवानी, रिया गणवानी, परिधी गनवाणी यांची उपस्थिती होती.
माता राणीची ज्योत पेटवून या कार्यक्रमाला सुरुवात झाली. कार्यक्रमाचा शेवटचा दिवस प्राईज डिस्ट्रीब्यूशन सोहळ्यामुळे विशेष लक्षवेधी ठरला. या भव्य कार्यक्रमाला स्वामी एज्युकेशनल ग्रुपचे चेअरमन रविद्र पवार, मनीषा पवार, डॉ. सुखदा पवार आणि पुष्पक पवार यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती.
हा दोन दिवसांचा गरबा महोत्सव अनेक सुंदर रंगांनी सजला होता. संगीत, प्रकाश, पारंपरिक पोशाख, आणि गरब्याच्या ठेक्यांवर थिरकणाऱ्या सहभागींच्या उत्साहाने परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. ‘भारती ज्वेलर्स’ यांच्या सौजन्याने विविध आकर्षक बक्षिसांचे वितरण करण्यात आले.
विजेते पुढीलप्रमाणे –
- बेस्ट परफॉर्मन्स
प्रथम क्रमांक – मेहेक जयसिंघानी, द्वितीय क्रमांक – भूमि जयसिंघानी, तृतीय क्रमांक – कशिश कोतवाणी - बेस्ट कॉस्ट्यूम
प्रथम क्रमांक – निम्रीत केसवानी, द्वितीय क्रमांक – भूमि कोतवाणी, तृतीय क्रमांक – भाविका रेतवाणी - बेस्ट कपल
प्रथम क्रमांक – स्वरांजली इंगळे आणि डॉ. सुखदा पवार, द्वितीय क्रमांक – परीधी गणवाणी आणि यामिनी कोंडे.
या सर्व विजेत्यांना खूप सुंदर आणि आकर्षक भेटवस्तू देऊन गौरवण्यात आले. तसेच स्वामी गरबा दांडिया मध्ये सहभागी सर्व सदस्यांना प्रमाणपत्रांनी सन्मानित करण्यात आले.
यशस्वीतेसाठी स्वामी परिवारातील सर्व सदस्यांनी मेहनत घेतली. विशेषतः नृत्य रचना व सरावासाठी डान्स कोरिओग्राफर युवराज महाजन, सुनील पवार आणि आर्या यांचे मोलाचे योगदान राहिले. या सोहळ्याचे विशेष आकर्षण म्हणजे भारती गनवानी, परिधी गणवानी आणि अनुराग गणवानी यांची मान्यवर उपस्थिती. तसेच अरुण शिंदे रावेर शहराचे प्रसिद्ध उद्योजक हे प्रमुख पाहुणे म्हणून लाभले.
संघटन, कला, परंपरा आणि उत्सव यांचा सुंदर संगम म्हणजे ‘स्वामी गरबा दांडिया नाईट’. पुढील वर्षी आणखी भव्य स्वरूपात हा कार्यक्रम साजरा करण्याचा निर्धार स्वामी परिवाराने व्यक्त केला आहे.




