तीन दिवसीय जिल्हास्तरीय शालेय डॉजबॉल स्पर्धेचे आयोजन

जळगाव (प्रतिनिधी) : क्रीडा व युवक सेवा संचनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जळगाव, जळगाव शहर महानगरपालिका, जळगाव जिल्हा ॲम्युचर डॉजबॉल असोसिएशन व बी. यू. एन. रायसोनी विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने 3 दिवसीय जिल्हास्तरीय डॉजबॉल क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेच्या उद्घाटन आमदार सुरेश भोळे (राजूमामा) यांच्या हस्ते करण्यात आले.
क्रीडा व युवक सेवा संचानालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जळगाव, जळगाव शहर महानगरपालिका, जळगाव जिल्हा ॲम्युचर डॉजबॉल असोसिएशन व बी. यू. एन. रायसोनी विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २६, २७ व २८ सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्म दिनानिमित्त राबवण्यात येणाऱ्या सेवा पंधरवाडा अभियाना अंतर्गत या जिल्हास्तरीय डॉजबॉल क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
याप्रसंगी महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, महानगर सरचिटणीस विशाल त्रिपाठी, माजी उपमहापौर सुनील वानखेडे, वीरण खडके, प्रदीप रोटे, सुनील सरोदे, किसन मराठे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यलयाचे राज्य क्रीडा मार्गदर्शक किशोर चौधरी, राजेश जाधव यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, स्पर्धक व शिक्षक उपस्थित होते.




