नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे करून तातडीने शेतकऱ्यांना भरपाई मिळवून द्या

भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाच्यावतीने जिल्हा प्रशासनाला निवेदनाव्दारे मागणी
जळगाव (प्रतिनिधी) : महिन्यात जिल्ह्यात वादळ व पाऊसामुळे मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले आहे. या अतिवृष्टिमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे शेतीचे पंचनामे करून त्यांना तातडीने नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाच्या वतीने जिल्हा प्रशासनास करण्यात आली. यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यकायात बुधवारी २४ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी आयुष्य प्रसाद यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, जळगाव जिल्हयामध्ये गेल्या महिन्या पासून वादळ व पाऊस अतिरिक्त प्रमाणात होत आहे. यामुळे शेतकऱ्यांचे कापूस, मका, केळी, सोयाबीन, ऊस, फळबाग व कडधान्य या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ढगफूटी मुळे शेतीचा या पिकांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, शेत जमिनीचा पृष्ठभाग वाहून गेला व घरांची पडझड झाली आहे. नदी नाल्यांना पूर आल्यामुळे पशुधन मोठ्या प्रमाणात वाहून गेले व मृत्युमुखी पडले आहेत. शेती बांध फुटून शेती पूर्णपणे उध्वस्त झाली शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे, तरी शेतकरी आज बेघर झाला आहे.
अशा आहेत मागण्या
- तातडीने नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामा करण्यात यावा.
- वाहून गेलेल्या जमिनीचा पंचनामा करून तातडीने शेतकऱ्यांना मदत करावी.
- बेघर झालेल्या लोकांना तातडीने घरे आणि जीवन अत्यावश्यक शेती निविष्ठा वस्तू पुरवठा करावा.
- जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करावा.
- नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना ताबडतोब भरपाई देण्यात यावी
- केळी पिकाला हमीभाव देण्यात यावा.
यांची होती उपस्थिती
निवेदन देतेवेळी भाजपा जळगाव (पश्चिम) जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी, किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष पोपट तात्या भोळे, प्रदेश चिटणीस सुरेश धनके यांच्यासह किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष विजय पाटील, जिल्हा सरचिटणीस राजेंद्र सोनवणे, पाचोरा तालुकाध्यक्ष विजय महाजन, चाळीसगाव तालुकाध्यक्ष देवेंद्र पाटील, रावेर तालुकाध्यक्ष राहुल महाजन, पाचोरा तालुकाध्यक्ष मनोज पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने भाजपा पदाधिकारी, कारकर्ते उपस्थित होते.




