
जळगाव, (प्रतिनिधी) : गुरुपौर्णिमेचे औचित्य साधत आज रावेर तालुक्यातील पाल येथे असलेल्या श्री वृंदावन धाम मधील कार्यक्रमात तसेच विविध ठिकाणी गोदावरी फाउंडेशनच्या संचालिका डॉ. केतकी पाटील यांनी उपस्थित राहून गुरुवंदना केली. तसेच संत महंतांचे आशीर्वाद घेतले.
गुरुपौर्णिमेनिमित्त सुने सावखेडे येथील कष्टभंजन मंदिराच्या परिसरात गोदावरी फौंडेशन संचलित डॉ. उल्हास पाटील रक्तपेढीतर्फे रक्तदान शिबीर घेण्यात आले. या प्रसंगी गोदावरी फाउंडेशन संचालिका डॉ. केतकी पाटील यांनी उपस्थित राहून रक्तदात्यांचे अभिनंदन केले. तसेच मंदिराचे दर्शन घेऊन श्री प.पू. सद्गुरू जगतप्रकाश स्वामी, श्री चेतन भगत स्वामी यांचे आशीर्वाद घेतले. तसेच निष्कलंक धाम येथे डॉ. केतकी पाटील यांनी गुरुपौर्णिमेनिमित्त जाऊन परमपूज्य महामंडलेश्वर जनार्दन हरी महाराज यांचे चरण स्पर्श केले.
याशिवाय रावेर तालुक्यातील पाल येथे श्री वृंदावन धाम या ठिकाणी गुरुपौर्णिमेनिमित्त सुरू असलेल्या श्रद्धेय गोपाळ चैतन्य महाराज यांचे प्रवचन व भजन या धार्मिक कार्यक्रमात डॉ. केतकी पाटील सहभागी होऊन महाआरती केली. येथे हजारोंच्या संख्येने भाविक उपस्थित होते. येथे भक्त भजनाच्या तालावर ठेका धरत होते. यावेळी गोपाळ चैतन्य महाराज यांच्या समवेत दिव्य चैतन्य महाराज, शाम चैतन्य महाराज, नवल चैतन्य महाराज आदींशी डॉ. केतकी पाटील यांनी संवाद साधला.