विश्व हिंदू परिषद दुर्गा वहिनीतर्फे विद्यापीठात ‘महिला सशक्तिकरण’वर कार्यक्रम

जळगाव (प्रतिनिधी) : विश्व हिंदू परिषद दुर्गा वहिनी तर्फे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ येथे महिला वस्तीगृहातील विद्यार्थिनींसाठी २१ रोजी व्यसनमुक्ती व महिला सशक्तिकरण या विषयावर कार्यक्रम आयोजित केला होता.
या कार्यक्रमांमध्ये डॉ. लीना पाटील यांनी व्यसन मुक्ती या विषयाबद्दल मार्गदर्शन केले. सध्या महाविद्यालयीन विद्यार्थिनींमध्ये वाढत चाललेले व्यसन ही खूप मोठी चिंताजनक बाब भविष्यात उभे राहू शकते अशी, खंत त्यांनी आपल्या मार्गदर्शनात व्यक्त केली.
या कार्यक्रमांमध्ये विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. व्हि. एल. माहेश्वरी व डॉ. मनिषा जगताप यांनी विशेष सहकार्य केले. तसेच हरिता विसावे, प्रिया महाजन, वेदिका चौधरी, जयश्री महाजन, आस्था पाटील, वैशाली जोशी, ज्योती नवाल, अमृता सोनवणे, कविता नाईक यांच्यासह मोठ्या संख्येने विद्यार्थिनीं उपस्थित होत्या.




