आरोग्यक्रीडाजळगावताज्या बातम्यानिवडपुरस्कारमहाराष्ट्रराष्ट्रीय-राज्यशैक्षणिक

विविध शालेय स्पर्धेमध्ये रावेरच्या स्वामी विवेकानंद विद्या मंदिर शाळेतील विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

मान्यवरांच्या हस्ते सत्कार; ईश्वरीची विभागीय तायक्वांडो स्पर्धेसाठी निवड

रावेर (प्रतिनिधी) : गेल्या आठवड्यात विविध प्रकारच्या शालेय तालुकास्तरीय व जिल्हास्तरीय स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेमध्ये रावेर येथील स्वामी विवेकानंद विद्या मंदिर या शाळेतील सर्व गटातील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. या विद्यार्थ्यांच्या मंगळवारी सत्कार करण्यात आला.

स्पर्धेत प्रामुख्याने खोखो, कबड्डी, तायक्वांदो, बुद्धिबळ या खेळातील मुला – मुलींच्या संघाने तसेच वैयक्तिक खेळाडूंनी तालुकास्तरीय विजय प्राप्त करून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्र झालेले आहे. तसेच इयत्ता सहावीची ईश्वरी दिलीप महाले या विद्यार्थिनीने तायक्वांडो स्पर्धेत जिल्हास्तरावर मजल मारून विभागीय स्तरासाठी ती पात्र ठरलेली आहे. या विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल २३ रोजी माध्यमिक मुख्याध्यापक राजू पवार, पर्यवेक्षिका कीर्ती कानुगो यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष रविंद्र पवार, संस्थेच्या सचिव मनीषा पवार यांच्यासह सर्व विभागप्रमुख यांनी खेळाडूंना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊन त्यांचे कौतुक केले. खेळाडूंना क्रीडा शिक्षक आनंदकुमार सपकाळ, राहुल जाधव, विष्णू चारण या यांचे मार्गदर्शन लाभले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button