जिल्हास्तरीय तायक्वांडो स्पर्धेत रावेरच्या स्वामी इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थिनींनी मारली बाजी

विभागीय स्पर्धेसाठी दोघा खेळाडूंची निवड
रावेर (प्रतिनिधी) : जळगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल येथे २० रोजी झालेल्या जिल्हास्तरीय तायक्वांडो स्पर्धेत रावेर येथील स्वामी इंग्लिश मीडियम स्कूलच्या पाच विद्यार्थिनींनी बाजी मारली आहे. त्यातील दोन खेळाडूंची आता विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
जळगाव येथे शनिवारी १४, १७ व १९ या वयोगटातील मुलींच्या शालेय जिल्हास्तरीय तायक्वांडो स्पर्धा पार पडल्या. त्यात रावेरच्या स्वामी इंग्लिश विभागाचे खेळाडू सहभागी झाले होते. त्यात १४ व १७ वयोगटातील जियांना मनू टि, नेत्रा निलेश महाजन, ख़ुशी विनोद बारी, भूमिका दीपक महाजन, दृष्टी दिनेश दीक्षित हे खेळाडू विजयी ठरले. त्यातील जियांना मनू टि व नेत्रा महाजन यांची विभागीय तायक्वांडो स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
या स्पर्धेत सर्व सहभागी खेळाडूंचे स्वामी इंग्लिश मीडियम शाळेचे अध्यक्ष रविंद्र पवार, सचिव मनिषा पवार, मुख्याध्यापक डॉ. सतीश यांनी अभिनंदन केले असून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. या स्पर्धेसाठी खेळाडूंना पर्यवेक्षिका शिंदे मॅडम, क्रीडाशिक्षक मंगेश महाजन, हर्षाली पवार, जयेश कासार, श्री मैराळे तसेच स्वामी स्पोर्ट्स क्लबचे सर्व आजी- माजी खेळाडूंचे सहकार्य लाभले.




