सेवा पंधरवाडा अभियानानिमित्त हमाल व मापाडी बांधवाना रुमाल वाटप

जळगाव (प्रतिनिधी) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत राबविण्यात येत असणाऱ्या सेवा पंधरवडा अभियानाच्या अनुषंगाने तसेच भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद चव्हाण यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीतील हमाल व मापाडी बांधवाना रुमाल वाटप करण्यात आले.
जळगाव शहराचे आमदार सुरेश दामू भोळे (राजूमामा), महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, सेवा पंधरवाडा अभियान संयोजक विजय वानखेडे, कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य मनोज बापू चौधरी, अशोक राठी यांची प्रमुख उपस्थिती होती.
यांची होती उपस्थिती
याप्रसंगी मंडल अध्यक्ष विनोद मराठे, मा.मंडल अध्यक्ष सुनील सरोदे, मिलिंद चौधरी, गजानन वंजारी, समाधान धनगर, हमाल संघटनेचे अध्यक्ष कामेश सपकाळे, सहसचिव शरद चौधरी, प्रदीप कवठे, कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यापारी बांधव दीपक महाजन, सुनील तापडिया , विष्णुकांत मनियार विशाल अग्रवाल, मांगीलाल जैन, विनय बाहेती, राजू जोशी, जगदीश वाणी, प्रकाश डोडीया, प्रकाश बिरला, महेश पुरोहित यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते व हमाल बांधव उपस्थित होते.




