आदिवासी पाड्यावर विद्यार्थ्यांनी स्वतः केलेल्या आकाश कंदीलाचा प्रकाश

जळगाव (प्रतिनिधी) : येथील रोटरी क्लब जळगाव व आरसीसी क्लब धानोरा यांच्या मार्गदर्शनाखाली धानोरा विद्यालयातील इंटरॅक्ट क्लबच्या विद्यार्थ्यांनी दिपावली निमित्ताने स्वतः बनवलेल्या आकाश कंदील आदिवासी पाडा – तांड्यावर लावून दीपोत्सव साजरा केला.
विद्यार्थ्यांनी स्वतः आदिवासी बांधवांच्या घरावर कंदील लावून त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलवले. यावेळी तेथील महिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू पाहून आनंद झाला व समाधान वाटल्याचे झि. तो. महाजन माध्यमिक व ना. भा. पाटील ज्युनिअर कॉलेजमधील इंटरॅक्ट क्लबचे विद्यार्थी सदस्यांनी व्यक्त केले.
यांची होती उपस्थिती
रोटरी क्लबच्या जळगावच्या माध्यमातून एक चांगलं कार्य करण्याचा योग मिळाल्याच्या भावना देखील इंटरॅक्ट क्लबच्या विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्यात. याप्रसंगी आरसीसी क्लबचे अध्यक्ष प्रदीप महाजन, सचिव वासुदेव महाजन, ट्रेझरर प्रमोद झंवर, सदस्य योगेश पाटील, शेखर पाटील, दिगंबर सोनवणे, मच्छिंद्र महाजन, जगदीशकुमार पाटील यांची उपस्थिती होती.
इंटरॅक्ट क्लबचे अध्यक्ष समर्थ पाटील, उपाध्यक्ष अभय महाजन, सचिव ईशांत पाटील, भाग्येश सूर्यवंशी, राज महाजन, कल्पेश महाजन, जिग्नेश पाटील, आचल व्यास, मिताली महाजन, हेमांगी महाजन, गुंजन महाजन, वेदिका महाजन यांनी आकाश कंदील बनवण्यासाठी परिश्रम घेतलेत.




