अभिवादनकलाकारजळगावताज्या बातम्यानिवडमहाराष्ट्रराष्ट्रीय-राज्यशैक्षणिक

श्रीमती कांताबाई जैन स्मृती राज्यस्तरीय वत्कृत्व स्पर्धेत हर्षाली पाटील, चंचल गांगुर्डे, मिताली काळे प्रथम

जळगाव (प्रतिनिधी) : जामनेर तालुक्यातील वाकोद येथील राणीदानजी जैन माध्यमिक व श्रीमती कांताबाई जैन उच्च माध्यमिक विद्यालयात श्रीमती कांताबाई जैन स्मृती राज्यस्तरीय वत्कृत्व स्पर्धा आयोजित केली होती. स्पर्धेत राज्यभरातून आलेल्या ८९ स्पर्धकांनी सहभाग घेतला. या स्पर्धेत मुलींचे वर्चस्व राहिले. स्पर्धेतील तिन्ही गटात मुलींनी पहिला क्रमांक मिळवला. हर्षाली पाटील, चंचल गांगुर्डे आणि मिताली काळे यांनी वत्कृत्व स्पर्धेतील प्रथम क्रमांकाचे पाच हजार रुपयांचे पारिषोतिक, स्मृतीचिन्ह मिळवले.

वत्कृत्व स्पर्धेसाठी पाचवी ते सातवी, आठवी ते दहावी आणि अकरावी ते बारावी असे तीन गट तयार करण्यात आले होते. स्पर्धेच्या उद्घाटनानंतर वत्कृत्व स्पर्धेला सुरुवात झाली. त्यात पाचवी ते सातवीच्या गटात हर्षाली प्रविण पाटील (पळासखेडा) हिने मिळवला. या गटात दुसरा क्रमांक केतकी मयूर बडगुजर (शेंदुर्णी) आणि निरज दीपकसिंग राजपूत (वाकोद) यांना देण्यात आला. तिसरा क्रमांक प्राजंली गणेश माळी (जामनेर) हिने मिळवला. आठवी ते दहावीच्या दुसऱ्या गटात पहिला क्रमांक चंचल वसंत गांगुर्डे हिने मिळवला. दुसरा क्रमांक भाग्यश्री सचिन नाईक (शेंदुर्णी) तर तिसरा क्रमांक मानसी दीपकसिंग राजपूत (वाकोद) आणि निरज दीपक पाटील (जामनेर) यांना मिळाला. तिसऱ्या गटात पहिला क्रमांक मिताली संदीप काळे, (जामनेरपुरा), दुसरा क्रमांक शरयू पांडुरंग थोरात (शेंदुर्णी) हिने मिळवला. तिसरा क्रमांक चेतन दिनेश पाटील (चोपडा) हिला मिळाला.

पारितोषिक वितरण समारंभाच्या अध्यक्षस्थानी शेंदुर्णी एज्युकेशन संस्थेचे सागरमल जैन होते. यावेळी व्यासपीठावर सहसचिन यु.यु.पाटील, जैन इरिगेशनचे दीपक चांदोलकर, ज्ञानेश्वर शेंडे, ए. ए.पटेल, विष्णू काळे, संजय पाटील, ए.टी.चौधरी, हेमंत पाटील, विनोदसिंह राजपूत, संतोष देठे, प्राचार्या रुपाली वाघ, तेजराज जैन, महावीर मुळेचा उपस्थित होते. आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगरमल जैन यांनी पद्मश्री भवरलाल जैन यांच्या आठवणींना उजाळा दिला. त्यांनी म्हटले की, मोठ्या भाऊंनी केवळ उद्योगाचा विस्तार केला नाही तर अनेक माणसे घडवली. ज्यांचा वर्तमानकाळ संघर्षाचा आहे, त्यांचे भविष्य उज्वल आहे, असे मोठेभाऊ नेहमी सांगत होते. यामुळे जीवनात नेहमी आत्मविश्वास कायम ठेवा, असा सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. जैन इरिगेशनचे ज्ञानेश्वर शेंडे यांनी विद्यार्थ्यांना काय बोलावे आणि कसे बोलावे? यासंदर्भात मोलाचे मार्गदर्शन केले.

स्पर्धेत ११ पैकी ८ पुरस्कार मुलींना

वत्कृत्व स्पर्धेत राज्यभरातून विद्यार्थी आणि विद्यार्थीनी आले होते. तीन गटात प्रत्येकी तीन पुरस्कार देण्यात येणार होते. परंतु वकोद शाळेचे दोन विद्यार्थी आल्यामुळे ९ ऐवजी ११ पुरस्कार देण्यात आले. त्यातील आठ पुरस्कार मुलींनी मिळवले. यामुळे मुली फक्त अभ्यासातच नाही तर सर्वच क्षेत्रात पुढे आहेत, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. पहिला पुरस्कार पाच हजार रुपये, स्मृतीचिन्ह आणि सन्मानपत्र असा होता. दुसरा पुरस्कार तीन हजार रुपये स्नमानपत्र आणि प्रमाणपत्र तर तिसरा पुरस्कार दोन हजार रुपये स्मृती चिन्ह आणि प्रमाणपत्र असा होता. सहभागी झालेल्या सर्वांना प्रमाणपत्र देण्यात आले. अमरावती येथून आलेल्या दोन विद्यार्थ्यांचा सत्कार यावेळी करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button