
रोटरी क्लब ऑफ जळगाव नॉर्थ व इनरव्हील क्लब ऑफ जळगाव इस्ट चा उपक्रम
जळगाव (प्रतिनिधी )- रोटरी क्लब ऑफ जळगाव नॉर्थ व इनरव्हील क्लब ऑफ जळगाव इस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार ४ जुलै रोजी आमिर खान निर्मित ‘सितारे जमीन पर’ हा सिनेमा दाखविण्यात आला.या उपक्रमाने दिव्यांग बालकांना मेजवानीसह जीवन जगण्याची प्रेरणा मिळाल्याचे उपस्थितांनी मत व्यक्त केले.
रोटरी क्लब ऑफ जळगाव नॉर्थ व इनरव्हील क्लब ऑफ जळगाव इस्ट या संस्थांनी उडान दिव्यांग केंद्रातील बालकांसाठी ‘सितारे जमीन पर’ या सिनेमाचे आयोजन केले होते. . जळगाव येथील पीव्हीआर येथे हा उपक्रम राबविण्यात आला.
या प्रसंगी रोटरी क्लब ऑफ जळगाव नॉर्थ चे अध्यक्ष बिपीन पाटील, सचिव हितेंद्र धांडे, भरत कार्डीले, चंदन कोल्हे, सूचिता चौधरी, दीपक पाटील, सोहम खडके, निशांत पोरणी, महेश चौधरी, प्रशांत अग्रवाल, इनरव्हील क्लब ऑफ जळगाव इस्टच्या प्रेसिडेंट सिमरन पाटील, सेक्रेटरी रितू शर्मा, आयएसओ रिटा भल्ला, ट्रेझरर नेहल कोठारी, सुलभा लढा, डीपीसीसी पीडीसी संगीता घोडगावकर, गोदावरी फाऊंडेशन संचालिका डॉ केतकी पाटील, ऍड कीर्ती पाटील, पायल चांदीवाल उडान संस्थेच्या संस्थापिका हर्षाली चौधरी आदी उपस्थित होत्या. सिनेमा दरम्यान विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला. सिनेमा बघण्याच्या आनंदात ते हरवून गेले होते.