स्वामी स्पोर्ट क्लबच्या विद्यार्थ्यांचा तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजय

सर्वत्र अभिनंदन; प्रथम क्रमांक पटकवत जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड
रावेर (प्रतिनिधी) : येथील क्रीडा संकुल येथे १७ रोजी १७ वर्षाआतील मुलांची तालुकास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत स्वामी विवेकानंद, विद्या मंदिर शाळेच्या विद्यार्थ्यांनी १७ वर्षाआतील गटात प्रथम क्रमांक पटकावला.
या कबड्डी स्पर्धेत स्वामी स्पोर्ट क्लबच्या मुलांनी त्यांचा विजय तालुका स्तरावर कायम ठेवला असून पुढील जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या घवघवीत यशाबद्दल स्वामी विवेकानंद विद्या माध्यमिक मंदिर, शाळेचे अध्यक्ष रवींद्र पवार, सचिव मनीषा पवार यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
शाळेचे मुख्याध्यापक राजू पवार, पर्यवेशिका निळे मॅडम व क्रीडाशिक्षक विष्णू चारण, मंगेश महाजन व मार्गदर्शन मैराळे सर, आनंद कुमार सपकाळे तसेच स्वामी स्पोर्ट्स क्लबच्या सर्व आजी-माजी खेळाडूंचे मार्गदर्शन लाभले. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी पुढील जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.




