मॅक्रो व्हिजन अकॅडमी, रावेरचा भुलाबाई महोत्सवात यशाचा ठसा !

रावेर (प्रतिनिधी) : केशव स्मृती प्रतिष्ठान जळगाव आयोजित भुलाबाई महोत्सव हा कार्यक्रम नुकताच डॉ. उल्हास पाटील शाळेत पार पडला. या स्पर्धेत मॅक्रो व्हिजन अकॅडमी, रावेरच्या इयत्ता चौथीच्या विद्यार्थिनींनी आपली कला सादर करत छोट्या गटात दुसऱ्या पारितोषिकाचा मान पटकावला. विजेत्या विद्यार्थिनींना स्मृतीचिन्ह, प्रशस्तीपत्रक व टिफिन बॉक्स देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
या यशामागे नृत्य शिक्षक रवी फुलमाळी आणि संगीत शिक्षक डिगंबर मुऱ्हाडकर यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांच्या कलेतील कल्पकता, सादरीकरणातील नजाकत आणि तालातील सुंदरता यामुळे परीक्षकांनी त्यांचे कौतुक केले.
‘पारंपारिक नृत्य हे आपल्या संस्कृतीचे जिवंत प्रतिबिंब आहे. नृत्यातून आपल्या परंपरा, इतिहास आणि लोकजीवनाचे दर्शन आमच्या विद्यार्थिनींनी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे, अशा शब्दात शाळेचे व्यवस्थापक किरण दुबे व शाळेचे मुख्याध्यापक जनार्दन धनके यांनी आपले मत व्यक्त केले आणि विजेत्या विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून त्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
या यशामुळे शाळेमध्ये आनंदाचे वातावरण असून शाळेचे चेअरमन श्रीराम पाटील, सेक्रेटरी स्वप्नील पाटील आणि जॉइंट सेक्रेटरी प्रमोद पाटील, शाळेच्या शैक्षणिक संचालिका वनिता पाटील यांनी विजेत्या विद्यार्थिनींचे कौतुक व आनंद व्यक्त केला आहे. तसेच शाळेचे उपाध्यक्ष ॲड. प्रवीण पासपोहे, खजिनदार विजय गोटीवांले, डायरेक्टर धनराज चौधरी यांनी विद्यार्थिनींना शुभेच्छा दिल्या. मॅक्रो व्हिजनच्या विद्यार्थ्यांनी आपल्या कलेद्वारे पुन्हा एकदा शाळेचा गौरव वाढवला आहे.




