अभिवादनआरोग्यऐतिहासिकजळगावताज्या बातम्याधार्मिकपर्यावरणमहाराष्ट्रराष्ट्रीय-राज्यसमस्यासामाजिक

डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानकडून ७५ टन निर्माल्य संकलन

जळगाव शहरात १४१२ स्वयंसेवकांकडून निर्माल्य संकलन

जळगाव (प्रतिनिधी) : यंदाच्या गणेशोत्सवाच्या समाप्तीनंतर शहरात पर्यावरणाची काळजी घेत डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा (ता. अलिबाग, जि. रायगड) वतीने एक अभिनव ‘निर्माल्य संकलन’ मोहीम राबवली. गणेश विसर्जन झाल्यानंतर शहराच्या प्रमुख चौकांमध्ये आणि विसर्जन घाटांवर जमा होणाऱ्या निर्माल्याचे योग्य व्यवस्थापन करण्यासाठी प्रतिष्ठानचे १४१२ स्वयंसेवक सज्ज झाले होते. या अभियानात व्दारे जळगाव शहरातून तब्बल ७५ टन निर्माल्य संकलन करण्यात आहे.

या उपक्रमाचे उद्घाटन जळगाव महानगरपालिकेत उत्साहात झाले. या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जळगाव शहर आमदार सुरेश भोळे, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि महानगरपालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे, श्रीफळ दाखवुन केले प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या उपक्रमात २२ वाहनांकडून जळगाव शहर, मन्यारखेडा, पिंप्राळा येथे यशस्वीरीत्या पार पडला.

ठीकठिकाणी भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद
शिवाजी उद्यान ग्राउंड येथे मोठे खड़डे करुन त्यात निमार्ल्य टाकण्यात आले. सुमारे १४१२ स्वयंसेवकांनी सकाळी १0 ते सकाळी ४ वाजेपर्यंत सातत्याने निर्माल्य संकलन केले. शहरात नेरी नाका,पांडे चौक,सिंधी कॉलनी, ईच्छा देवी चौफुली, डी मार्ट जवळ, गणेश घाट,मन्यारखेडा, पिंप्राळा चौक, मेहरुण तलाव या ठिकाणी भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत निर्माल्य दान केले. एकूण ११ ठिकाणी चाललेल्या या उपक्रमातून तब्बल अंदाजे ७५ ते ८० टन निर्माल्य संकलित करण्यात आले.

संकलित निर्माल्याचे खत तयार करून ते वृक्षारोपण उपक्रमांसाठी वापरले जाणार आहे. उद्देश निर्माल्य एकत्र करून त्याचे कंपोस्ट खत बनवणे आणि पर्यावरण स्वच्छ ठेवणे हा आहे. प्रतिष्ठानतर्फे सामाजिक प्रबोधन, अंधश्रद्धा निर्मूलन, व्यसनमुक्ती, वृक्षलागवड, जलसंधारण, रक्तदान, आरोग्य शिबिरे, निर्माल्य संकलन व कंपोस्टिंग अशा अनेक क्षेत्रात कार्य होत आहे. “Where there is need for the society, we are working in that field” या ब्रीदवाक्यानुसार, प्रतिष्ठान सातत्याने समाजहितासाठी कार्यरत आहे. या अभियानामुळे जळगाव शहरात पर्यावरण संवर्धनाचा एक मोठा उपक्रम आकारास येणार असून, समाजातील विविध घटकांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून येत आहे. *”धर्म, पर्यावरण आणि सामाजिक जबाबदारी” या त्रिसूत्रीचा संदेश देणारे हे अभियान आगामी दिवसांत शहरासाठी आदर्श ठरणार आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button