गरजू विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप; शैक्षणिक सहकार्याचा सुंदर उपक्रम

धामोडी (प्रतिनिधी) : रावेर तालुक्यातील खिर्डी बू. धामोडी, शिंगाडी, पूरी, गोलवाडे, भामलवाडी आदी गावांमध्ये नंदू महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांसाठी मोफत वह्या वाटप करण्यात आले. शैक्षणिक वाटचालीत विद्यार्थ्यांना गरजेच्या वस्तू वेळेवर मिळणे महत्त्वाचे असल्याचे सांगत या उपक्रमातून शालेय विद्यार्थ्यांना वह्या देण्यात आल्या. शिक्षणाच्या प्रवासात कोणताही आर्थिक अडथळा येऊ नये, यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला.
या कार्यक्रमास भाजपा तालुका अध्यक्ष दुर्गादास पाटील, सोनु पाटील, धनराज पाटील, संजय कावडकर, धीरज पाटील, राजेंद्र पाटील, नितीन पाटील, जयचंद्र पाटील, सरपंच लखण पाटील, जगदीश पाटील, संदीप पाटील, श्री हरिभाऊ, वासुदेव कोळी, बळीराम पाटील, आनंदा पाटील, राजेंद्र पाटील, माणिकराव पाटील, अतुल पाटील, पवन पाटील, नितीन जैस्वाल, जयश निमगडे यांच्यासह शिक्षकवर्ग, पालक, भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमात बोलताना मान्यवरांनी विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवणे आणि त्यांच्या स्वप्नांना दिशा देणे ही लोकप्रतिनिधींची खरी जबाबदारी असल्याचे सांगितले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, शिक्षणासाठी मिळालेली ही मदत त्यांना निश्चितच प्रोत्साहन देणारी ठरणार आहे.




