आदिवासी पाड्यावर रोटरी गोल्डसिटीने दिवाळीत पसरविला चैतन्याचा प्रकाश

जळगाव (प्रतिनिधी) : येथील रोटरी क्लब ऑफ जळगाव गोल्डसिटीने चोपडा तालुक्यातील पानशेवडी येथील आदिवासी पाड्यावर जाऊन त्या बांधवांमध्ये दिवाळी निमित्त फराळ व कपडे भेट देऊन चैतन्याचा प्रकाश पसरविला.
दरवर्षी रोटरी गोल्डसिटीतर्फे या पाड्यावर दिवाळी साजरी करण्यात येते. यावर्षी त्यासोबत वैद्यकीय तपासणी शिबिराचे आयोजन देखील करण्यात आले होते. त्यात नेत्र तपासणी, ब्लड शुगर, हिमोग्लोबिन तपासणी व मार्गदर्शन आणि मोफत औषधांचे वितरण करण्यात आले.
यावेळेस अध्यक्ष डॉ.नीरज अग्रवाल, मानद सचिव स्वप्निल पलोड, मेडिकल कमिटी चेअरमन डॉ. सूर्यकिरण वाघण्णा, सतीश मंडोरा, नंदू अडवाणी यांची प्रमुख उपस्थिती होती. यशस्वीतेसाठी रोटरी गोल्डसिटीचे माजी अध्यक्ष प्रकाश पटेल, निलेश जैन, डॉ.गजानन पाटील, डॉ.प्रीती चौधरी, अशोक जैन, किशोर पाटील, अनिका मंडोरे, राधिका सोनी यांनी परिश्रम घेतले.




