विश्व हिंदू परिषद जिल्हा सेवा विभाग आणि मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष च्यावतीने कौतिक नगरात आरोग्य शिबिर

जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील कौतिक नगर येथे मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष, विश्व हिंदू परिषद जळगाव जिल्हा सेवा विभाग यांचे मार्फत नुकतेच जय हो मित्र मंडळ येथे गणपती उत्सवानिमित्त मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये ११० हून अधिक रुग्णांची तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान काही रुग्णांचे पुढील उपचारासाठी मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाकडून मदत केली जाणार आहे.
या शिबिरासाठी विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा सेवा प्रमुख डॉ.हितेंद्र गायकवाड आणि सहसेवा प्रमुख दीपक दाभाडे, तसेच मुख्यमंत्री सहायता निधी जळगाव कक्षाचे प्रमुख डॉ.सिद्धार्थ चौधरी , उत्तर महाराष्ट्र समन्वयक डॉ. तुषार सावरकर आणि (Mjpjay district Head) यांनी संपूर्ण नियोजन केले होते.
शिबिरात विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा सह मंत्री राजेंद्र गांगुर्डे, आणि सामाजिक कार्यकर्ता सुचित्राताई महाजन, माजी नगरसेवक वानखेडे व रोहन महाजन यांची प्रमुख उपस्थिती होती.
रुग्ण तपासणीसाठी शहरातील गोल्ड सिटी टीम, विश्व प्रभा हॉस्पिटल टीम , शासकीय होमिओपॅथी कॉलेज जळगाव, महा लॅब टीम यांचे सहकार्य लाभले.
यशस्वितेसाठी जय हो मित्र मंडळ कौतिक नगर, आयोध्या नगरातील पदाधिकारी आणि सदस्य पंकज तायडे, सागर सोनवणे, आकाश तायडे, गोपाळ तायडे, सचिन शर्मा, मोहित शर्मा, राहुल राठोड, योगेश चौधरी, पिंटू चौधरी गोलू तायडे, गणू तायडे, भगवंत पाटील आदींनी परिश्रम घेतले.




