क्रीडाजळगावताज्या बातम्यानिवडपुरस्कारशैक्षणिक

रावेरच्या स्वामी विवेकानंद विद्यामंदिर शाळेची तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत तेजस्वी कामगिरी

दोन्ही विद्यार्थिनींची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड

रावेर (प्रतिनिधी) : येथील कमलाबाई हायस्कूल येथे घेण्यात आलेल्या रावेर तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत स्वामी विवेकानंद विद्यामंदिर, रावेर या शाळेतील विद्यार्थिनी १४ वर्षाखालील मुलींच्या गटातून लावण्या अंकुश जोशी (इयत्ता सहावी) व मृदुला संजीव पाटील (इयत्ता सहावी) या दोन्ही विद्यार्थिनींची जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड झालेली आहे. ही अत्यंत गौरवाची बाब असून या मुलींच्या यशाने संपूर्ण शाळेचा अभिमान वाढवला आहे. त्यांच्या यशाचे श्रेय तिच्या मेहनतीला, पालकांच्या पाठबळाला आणि प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाला जाते.

त्यांना पुढील स्पर्धेसाठी शाळेचे अध्यक्ष रवींद्र पवार, सचिव मनीषा पवार, संचालिका डॉ. सुखदा पवार, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक राजू पवार प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका धांडे मॅडम, माध्यमिक विभागाच्या पर्यवेक्षिका निळे मॅडम तसेच संपूर्ण स्वामी परिवारातील शिक्षक बंधू-भगिनी यांनी त्यांचे व त्यांच्या कुटुंबियांचे अभिनंदन करून उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. या विद्यार्थिनींना प्रशिक्षक म्हणून राहुल जाधव, सपकाळ सर व विष्णू सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button