हरिविठ्ठल नगरात मोफत आरोग्य शिबिरात घेतला १२५ रुग्णांनी लाभ

विश्व हिंदू परिषद जिल्हा सेवा विभाग आणि मुख्यमंत्री सहायता निधी कक्षचा उपक्रम
जळगाव (प्रतिनिधी) : शहरात हरीविठ्ठल नगर येथे मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष, विश्व हिंदू परिषद जळगाव व जिल्हा सेवा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने गणपती उत्सवानिमित्त नवनाथ गणपती मंडळ येथे मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या १२५ हून अधिक 125 रुग्णांची तपासणी करण्यात आली. तसेच तपासाअंती काही रुग्णांना पुढील उपचारासाठी मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाकडून मदत केली जाणार आहे.
या शिबिरासाठी विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा सेवा प्रमुख डॉ.हितेंद्र गायकवाड आणि सहसेवा प्रमुख दीपक दाभाडे, तसेच मुख्यमंत्री सहायता निधी जळगाव कक्षाचे प्रमुख डॉ.सिद्धार्थ चौधरी यांनी संपूर्ण नियोजन केले होते. शिबिरात विश्व हिंदू परिषदेचे प्रांत मंत्री योगेश्वर गर्गे, जिल्हाध्यक्ष हरीश मुंदडा, प्रांत सहमंत्री ललित चौधरी, विभाग सहमंत्री देवेंद्र भावसार, जिल्हा सहमंत्री राजेंद्र गांगुर्डे, संपर्कप्रमुख ललित खडके यांची प्रमुख प्रमुख उपस्थिती होती.
रुग्ण तपासणीसाठी शहरातील शाहू महाराज हॉस्पिटल येथील डॉ.जागृती नारखेडे, रोशनी जगताप, आराधना पवार, कुमुदिनी घुगे, रवींद्र मोरे व डॉ.सिमरन वाधवा तसेच खेलवाडे हॉस्पिटल येथील डॉ.वैशाली शिरसाठ, करुणा बडगुजर व नीलकमल हॉस्पिटल येथील डॉ.यशवंत पाटील, प्रणय कुलकर्णी, प्रिया बिसेन यांची उपस्थिती होती.
यशस्वितेसाठी मंडळाचे दिनेश खारकर, दीपक हटकर, राजेश महाजन, गोपाल हटकर, योगेश अहिरे, ललित इंगळे, गणेश ठाकूर, राकेश कोळी, मुकेश ठाकरे, सागर कोळी, सोनू कोळी, साई मोरे आदींनी परिश्रम घेतले.




