‘मॅक्रो व्हिजन अकॅडमी’चा विद्यार्थी आयुष पाटील तालुका बुद्धिबळ स्पर्धेत विजयी

रावेर (प्रतिनिधी) : येथील मॅक्रो व्हिजन अकॅडमी शाळेतील विध्यार्थी आयुष चंद्रकांत पाटील याने तालुका स्तरावरील अंडर-१४ बुद्धिबळ स्पर्धेत विजेतेपद पटकावले आहे. या यशाबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत असून शाळेच्या वतीने त्याला पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहे. ही स्पर्धा सौ. कमलाबाई एस . अगरवाल गल्स हायस्कूल, रावेर येथे घेण्यात आली.
मॅक्रो व्हिजन अकॅडमी, रावेरचा विद्यार्थी आयुष पाटील याने या बुद्धिबळ स्पर्धेत विजय मिळवून आपले कौशल्य सिद्ध केले आहे. बुद्धिबळाचा खेळ हा केवळ डावपेच शिकवत नाही तर संयम, शिस्त आणि सतत चांगला पर्याय शोधण्याची सवय लावतो, हे त्याच्या खेळातून दिसून आले. आयुषच्या या यशामागे त्याचे मेहनती प्रयत्न तसेच मार्गदर्शक PTI सुरज भालेराव यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे.
आजचे यश हे उद्याच्या मोठ्या यशाचा पाया आहे व विद्यार्थ्यांच्या मेहनतीला मिळालेले यश हे शाळेचा अभिमान आहे, अशा शब्दांत शाळेचे मुख्याध्यापक जनार्दन धनगर व व्यवस्थापक किरण दुबे यांनी आयुषचे अभिनंदन केले आहे. आता आयुषचे पुढील लक्ष्य जिल्हा स्तरावरील स्पर्धा आहे.
शाळेचे चेअरमन श्रीराम पाटील, सेक्रेटरी स्वप्नील पाटील आणि जॉइंट सेक्रेटरी प्रमोद पाटील, शाळेच्या शैक्षणिक संचालिका वनिता पाटील यांनी विजेत्या विद्यार्थ्याचे कौतुक व आनंद व्यक्त केला आहे. तसेच शाळेचे उपाध्यक्ष ॲड. प्रवीण पासपोहे, खजिनदार विजय गोटीवांले यांनी विद्यार्थ्याला शुभेच्छा दिल्या.




