
पारोळा (प्रतिनिधी) : येथील राणी लक्ष्मीबाई महाविद्यालय, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ व उत्कर्ष जेष्ठ नागरिक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने “ऊर्जा ज्येष्ठ नागरिकांची” या विषयावर ज्येष्ठ नागरिकांसाठी एकदिवसीय कार्यशाळा झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संचालक ॲड.रोहन मोरे होते.
व्यासपीठावर प्रमुख मार्गदर्शक ज्येष्ठ पत्रकार दिलीप वैद्य, अरुण रोडे मा. अध्यक्ष फेसकॉम, पुणे, प्रमुख अतिथी प्रा.डॉ.संदिप नेरकर सिनेट सदस्य, संचालक भानुदास मोरे, प्रा.विकास सोनवणे, भिका कासार, बंडू वाणी, प्राचार्य डॉ.व्हि.आर.पाटील, समन्वयक डॉ.डि.एच.राठोड उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते तुळशीला जलपूजन व राणी लक्ष्मीबाई यांच्या प्रतिमेला माल्यार्पनाने करण्यात आली.
मान्यवरांनी केले मार्गदर्शन
कार्यशाळेचे प्रास्ताविक डॉ.डि.एच.राठोड यांनी केले. प्राचार्य डॉ.व्हि.आर.पाटील यांनी मनोगतात विद्यापीठ आमच्या महाविद्यालयाला समाजोपयोगी उपक्रम राबविण्याची संधी उपलब्ध करून देत असल्याने ज्येष्ठांसाठी, शेतकऱ्यांसाठी कार्यशाळेचे यशस्वी आयोजन करता येते भविष्यात देखील अशा कार्यशाळा नक्कीच घेवू असे नमूद केले. डॉ.संदिप नेरकर यांनी घराला घरपण ज्येष्ठांमुळे येते, त्यांच्या मार्गदर्शनाने व अनुभवाने एकत्रित कुटुंब व्यवस्था चालते त्यांचा मानसन्मान झालाच पाहिजे असे सांगितले.
ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र मंत्रालयाची मागणी
अध्यक्षीय मनोगतात ॲड.रोहन मोरे यांनी ज्येष्ठांच्या समस्या समजून घेणे, त्यांचा सहवास, संवाद,अनुभव, मार्गदर्शनाने कुटुंब व्यवस्था बळकट व टिकून राहते असे नमूद केले. त्यानंतर प्रथम सत्राचे अध्यक्ष प्र.प्राचार्य व्हि.एन.कोळी होते तर मार्गदर्शक दिलीप वैद्य यांनी जेष्ठ नागरिकांना वयाचे बंधन नसून ते वयस्क असले तरी समाजसेवा व मार्गदर्शनाच्या भूमिकेत सदैव तत्पर असल्याचे सोदाहरण देत सांगितले. दुसरे सत्राचे अध्यक्ष प्रा.विकास सोनवणे होते तर मार्गदर्शक अरुण रोडे होते त्यांनी जेष्ठ नागरिक संघाची आवश्यकता,एकत्र येवून समस्यांचे निराकरण करणे, समाजासाठी काम सुरू ठेवणे, आरोग्याची काळजी घेणे, कायदेविषयक मार्गदर्शन घेणे तसेच शासनाला ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध कल्याणकारी योजनांसाठी महामंडळ व स्वतंत्र मंत्रालय असावे अशी मागणी केली असून ज्येष्ठांना सन्मानपूर्वक वागणूक मिळावी व एकत्रित कुटुंब व्यवस्था व पद्धतीसाठी त्यांचे अस्तित्व महत्वाचे असल्याचे नमूद केले.
सुत्रसंचालन प्रा.आर.बी.पाटील यांनी तर आभारप्रदर्शन प्रा.जे.बी.पाटील यांनी केले.कार्यशाळा यशस्वीतेसाठी उपप्राचार्य डॉ.एस.बी.भावसार, डॉ.जी.पी.बोरसे, डॉ.अजय पाटील, डॉ.वंदना पाटील,के.वाय.पाटील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांचे सहकार्य लाभले. कार्यशाळेस अनेक जेष्ठ नागरिक महिला व पुरुष बहुसंख्येने उपस्थित होते.




