
मातीपासून गणेशमूर्ती बनवीण्याचे विद्यार्थ्यांना दिले प्रशिक्षण
रावेर (प्रतिनिधी) : येथील रा.का . इंटरनॅशनल स्कूलने एक अनोखा उपक्रम राबवून विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाची जाणीव निर्माण केली. ‘गणपती बनविणे कार्यशाळा’ आयोजित करून शाळेने विद्यार्थ्यांना मातीपासून गणेशमूर्ती तयार करण्याचे प्रशिक्षण दिले. ज्यामुळे कला आणि पर्यावरण संरक्षण यांचा सुंदर संगम साधला गेला.
शाळेच्या कमिटीचे अध्यक्ष भरत नाईक यांच्या मार्गदर्शनाने व सुचनेने या कार्य शाळेचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमच्या अध्यक्षस्थानी महेंद्र पवार होते. प्रमुख पाहुणे अतुल मालखेडे यांच्या हस्ते गणपतीच्या पूजनाने आणि आरतीने झाली. ‘वक्रतुंड महाकाय’ या श्लोकाच्या सामूहिक पठणाने वातावरण मंगलमय झाले.
अतुल मालखेडे यांनी मूर्ती बनवण्याबद्दल अत्यंत सोप्या पद्धतीने मार्गदर्शन केले. या अनोख्या उपक्रमातून विद्यार्थ्यांना कलाकौशल्य शिकायला मिळालेच, शिवाय पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचा महत्त्वाचा संदेशही शाळेला त्यांच्यापर्यंत पोहोचवता आला. सर्वोत्तम गणेशमूर्ती बनवणाऱ्या विद्यार्थ्यांना गौरवण्यात आले. ज्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढला. शाळेने राबवलेला हा उपक्रम खऱ्या अर्थाने कौतुकास्पद असून, यामुळे विद्यार्थ्यांमध्ये कला आणि सामाजिक जाणीव या दोन्ही गोष्टींचा विकास साधला गेला. तसेंच ही कार्यशाळा शाळेचे शिक्षक व शिक्षेकेतर कर्मचारी यांनी यशस्वी पार पाडली तसेंच सर्व पालकांनी या कार्यशाळेचे खूप कौतुक केले आहे.




