क्रीडाजळगावताज्या बातम्यानिवडशैक्षणिक

तालुकास्तरीय कॅरम स्पर्धेत मॅक्रो व्हिजन येथील विद्यार्थ्यांचा दणदणीत विजय

रावेर (प्रतिनिधी) : तालुकास्तरीय कॅरम स्पर्धेत येथील मॅक्रो व्हिजन अकॅडमी येथील विद्यार्थ्यांचा दणदणीत विजय मिळवला. शाळेचा अभिमान वाढवणारी आणखी एक घटना म्हणजे तालुका स्तरीय कॅरम स्पर्धेत शाळेच्या तीन विद्यार्थ्यांनी विजेतेपद मिळविले.

या स्पर्धेत जीविका सुभाष महाजन (इयत्ता सातवी), विघ्नेश सागर हटकर (आठवी) व प्रज्ञा दीपक अटकाळे (नववी) या विद्यार्थ्यांनी आपली चमकदार कामगिरी सादर करून शाळेचे नाव उज्ज्वल केले. शाळेचे चेअरमन श्रीराम पाटील आणि जॉइंट सेक्रेटरी प्रमोद पाटील यांच्यासह शाळेचे उपाध्यक्ष ॲड. प्रवीण पासपोहे, खजिनदार विजय गोटीवांले यांनी या विद्यार्थ्यांचे कौतुक करून भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button