आरोग्यजळगावताज्या बातम्यापर्यावरणमहाराष्ट्रशासकीयशेतकरीसमस्या

हतनूर धरणाचे २० दरवाजे उघडले

१ लाख २४ हजार क्युसेक्स विसर्ग नदीपात्रात; नदी काठच्या गावांना दिल्या सतर्कतेच्या सूचना

जळगाव (प्रतिनीधी) : हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पावसामुळे धरण पातळीत वाढ होत असल्याने २० ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता हतनूर धरणातून ३५१७ क्युमेक्स (१२४२०३ क्युसेक्स) इतका प्रवाह नदीपात्रात सोडण्यात आला आहे. यासाठी धरणाची एकूण २० गेट पूर्णपणे उघडण्यात आली आहेत, अशी माहिती जळगाव पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी दिली.

नदीकाठच्या गावांमध्ये पूरस्थिती उद्भवू नये यासाठी प्रशासनाकडून सतर्कता बाळगण्या बाबतचे निर्देश दिले आहेत.याबाबत जिल्हाधिकारी यांना कळविण्यात आले आहे. संबंधित प्रांत अधिकारी व तहसीलदारांना योग्य त्या सूचना देण्यात आल्या असल्याचेही सांगण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button