आरोग्यऐतिहासिकजळगावताज्या बातम्यामहाराष्ट्रयोजनाराष्ट्रीय-राज्यरोजगारशासकीयशेतकरीसमस्या

भागपूर उपसा सिंचन योजनेला वेग

मंत्री गिरीश महाजन यांनी घेतला आढावा, शेतकऱ्यांना मिळणार भरघोस फायदा

जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव जिल्ह्यातील महत्वाकांक्षी भागपूर उपसा सिंचन योजनेचे काम वेगाने प्रगतीत असून या योजनेमुळे जळगाव, जामनेर व पाचोरा तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. प्रकल्पाचा आढावा रविवारी राज्याचे आपत्ती व्यवस्थापन व जलसंपदा मंत्री तथा आमदार गिरीश महाजन यांनी घेतला.

याप्रसंगी अभियंता व्ही.डी. पाटील, अधीक्षक अभियंता गो.श्रा. महाजन, कार्यकारी अभियंता प्र.पा.वराडे, उपअभियंता च.सु. खंबायत, सहायक अभियंता रा.भ. पाटील उपस्थित होते.

प्रकल्पाचा खर्च व सिंचन क्षेत्र
या योजनेची एकूण अंदाजित किंमत रु. ३५३३.०५ कोटी इतकी असून, सदर योजनेतून ५ मध्यम व ४४ लघु प्रकल्पांचे स्थिरीकरण करण्यात येत आहे. प्रकल्पाचा एकूण पाणीसाठा १९२.६५६ दलघमी असून ३०,७६४ हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ मिळणार आहे.

पहिल्या टप्प्यात २६ गावांना फायदा
प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील लाभक्षेत्र १३,९०४ हेक्टर आहे. जळगाव तालुक्यातील पुढील २६ गावांना सिंचनाचा थेट फायदा होणार आहे.
ही गावे अशी : चिंचोली, कंडारी, उमाळे, पाथरी, धानवड, शिरसोली प्र. बो., दापोरे, जावखेडे, शिरसोली प्र. नो., देव्हारी, कुऱ्हदडे, वराड खु., वाकडी, वावदडे, रामदेववाडी, लोणवाडी खु., वसंतवाडी, विटनेर, जळके, लोणवाडी बृ., बिलखेड, बिलवाडी, डोमगाव, सुभाषवाडी, वदली, वराड बृ.

दुसऱ्या टप्प्यात १६,८६० हेक्टर लाभक्षेत्र
प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात प्रस्तावित पाणीसाठा ९८.३५ दलघमी असून लाभक्षेत्र १६,८६० हेक्टर आहे. त्यात जामनेर तालुक्यातील २२ लघु व २ मध्यम प्रकल्प, पाचोरा तालुक्यातील २० लघु व ३ मध्यम प्रकल्प, तर जळगाव तालुक्यातील २ लघु प्रकल्पांची तूट भरून काढली जाणार आहे. याशिवाय कांग प्रकल्पाची उंची वाढ, गोलटेकडी ल.पा. प्रकल्प व एकुलती सा.त. प्रकल्पांचाही समावेश आहे.

शेतकऱ्यांना दिलासा
या योजनेमुळे जळगाव, जामनेर व पाचोरा तालुक्यातील शेतकरी थेट लाभार्थी ठरणार असून, सिंचनाची सुविधा उपलब्ध झाल्याने शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढणार आहे व कृषी उत्पादनात मोठी भर पडणार आहे.

मंत्री गिरीश महाजन यांचा विश्वास
भागपूर उपसा सिंचन योजना कार्यान्वित झाल्यानंतर जिल्ह्यातील शेतीचे भविष्य उज्ज्वल होईल, असा विश्वास राज्याचे आपत्ती व्यवस्थापन व जलसंपदा मंत्री नामदार गिरीश भाऊ महाजन यांनी व्यक्त केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button