ऐनपूरच्या सरदार वल्लभभाई पटेल विद्यामंदिरात चित्रकला, रांगोळी स्पर्धा

‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत उपक्रम, १५० विद्यार्थ्यांचा सहभाग
ऐनपूर, ता.रावेर (प्रतिनिधी) : शासनाने १५ ऑगस्टपर्यंत देशभरात ‘हर घर तिरंगा’ हे अभियान राबविण्याचे निर्देश केलेले आहेत. या अभियानांतर्गत ऐनपूर परिसर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सरदार वल्लभभाई पटेल पूर्व प्राथमिक व प्राथमिक विद्यामंदिर, ऐनपूर येथे चित्रकला व रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
हे अभियान यशस्वी करण्यासाठी शाळेत देशभक्ती, स्वातंत्र्य दिन आदी विषयांवर स्पर्धा घेण्यात आली. चित्रकला व रांगोळी स्पर्धेत १५० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. शाळेचे मुख्याध्यापक अक्षय पाटील यांनी स्पर्धेचे उदघाट्न केले. यावेळी उपशिक्षिका निकिता चौधरी, कल्याणी शिंदे, जयश्री सराफ, ममता पाटील, काजल धनगर व उपशिक्षक किरण चौधरी, शिवम चौधरी उपस्थित होते.
स्पर्धेत प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांचा निकाल घोषित करून त्यांना बक्षीस व प्रमाणपत्र देण्यात आली. यावेळी परीक्षक म्हणून वैष्णवी महाजन यांनी काम पहिले. उपस्थितांचे स्वागत आयुष चौधरी यांनी तर सूत्रसंचालन श्रद्धा बारी यांनी केले. तर आभार संजना महाजन यांनी मानले. यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी काम पहिले.




