
जळगाव (प्रतिनिधी) : नागरिकांच्या तक्रारी व समस्यांचे स्थानिक स्तरावर निराकरण व्हावे या उद्देशाने दरमहा तालुका स्तरावर लोकशाही दिन आयोजित केला जातो. याच पार्श्वभूमीवर जळगाव तालुकास्तरीय लोकशाही दिन सोमवार, १८ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता तहसील कार्यालय, जळगाव येथे आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती तहसीलदार शितल राजपूत यांनी दिली आहे.
सर्वसामान्य जनतेच्या तक्रारी, अडचणी यांचे तात्काळ निरसन करण्यासाठी शासनामार्फत प्रभावी उपाययोजना म्हणून लोकशाही दिन राबविण्यात येतो. या उपक्रमाच्या अंतर्गत नागरिकांच्या तक्रारींना तत्काळ व न्याय्य तोडगा मिळावा, यासाठी जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त तसेच मंत्रालय स्तरावरही हा दिन साजरा केला जातो. प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते.
तरी नागरिकांनी या दिवशी हजर राहून स्वतःच्या तक्रारींचे निवेदन सादर करून त्या तक्रारींचे तात्काळ निरसन करून घ्यावे, असे आवाहन तहसील कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.




