ऐनपूरच्या स्वामी अकॅडमी शाळेत स्वातंत्र्य दिन साजरा

रावेर (प्रतिनिधी) : येथील स्वामी अकॅडमी शाळेत भारताचा ७९ वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रम शाळेचे मुख्याध्यापक मनु अँटोनी यांच्या मार्गदर्शनानुसार पार पडला. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व भारतमाता पूजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावातील पालक प्रतिनिधी योगेश पाटील यांची निवड करण्यात आली. यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आला. यानंतर मान्यवरांचा गुलाबपुष्प देऊन स्वागत सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प्रियंका महाजन, ब्रिजलाल तायडे, मनोहर चौधरी, प्रमोद महाजन, दत्तात्रय पाटील – पुरी गोलवाडे, राजेंद्र पाटील, महेश चऱ्हाटे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी शाळेतील काही विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे गीत, नृत्य व भाषणे सादर केली. शिक्षिका शारदा कोंडे व आशा लोहार यांनी मनोगत व्यक्त केले. पालक प्रतिनिधी ब्रिजलाल तायडे व मुख्याध्यापक मनु अँटोनी यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. सर्व मान्यवरांच्या हस्ते सर्व विद्यार्थ्यांना चॉकलेट वाटप करण्यात आल्या.
सुत्रसंचालन रुपाली कोंडे यांनी केले. तर आभार नेहा पाटील यांनी मानले. यशस्वीतेसाठी निलेश महाजन, मिलिंद पाटील, अनिकेत महाजन, रुपाली महाजन, पल्लवी महाजन, अनुपमा पाटील, निकिता राणे, आशाताई सोनार व शीतलताई महाजन यांनी परिश्रम घेतले.




