कॅरम स्पर्धेत अनुभूती इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनीची उत्कृष्ट कामगिरी!

धीरज घुगे, साहिल सोनवणे, आरुषी सोलसे आणि पूर्वी भावसारची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड
जळगाव (प्रतिनिधी) : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नाशिक आणि नाशिक जिल्हा कॅरम असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विभागीयस्तरीय शालेय कॅरम क्रीडा स्पर्धा १६ व १७ ऑक्टोबर रोजी जिल्हा क्रीडा संकुल, नाशिक येथे पार पडली. या स्पर्धेत अनुभूती इंग्लिश मीडियम स्कूल, जळगाव येथील विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत उल्लेखनीय यश संपादन केले.
१४ वर्षांखालील गटात पूर्वी भावसार (चौथा क्रमांक) व साहिल सोनवणे (पाचवा क्रमांक) यांनी उल्लेखनीय खेळ दाखवला. तर १७ वर्षांखालील गटात आरुषी सोलसे हिने दुसरा क्रमांक, तर धीरज घुगे याने प्रथम क्रमांक पटकावत स्पर्धेतील विजेतेपद मिळवले. या उत्कृष्ट कामगिरीच्या बळावर या चौघांची राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेसाठी कोल्हापूर येथे निवड झाली आहे.
या यशामागे शाळेचे अध्यक्ष अतुल जैन, संचालिका निशा भाभी जैन, मुख्याध्यापिका रश्मी लाहोटी, तसेच रूपाली वाघ, मनोज दाडकर, प्रशिक्षक आयेशा खान, आणि क्रीडा शिक्षक श्वेता कोळी व आकाश धनगर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे. या विजयाबद्दल सर्व विजेत्या विद्यार्थ्यांचे शाळेत आणि पालकवर्गात अभिनंदनाचे वातावरण निर्माण झाले आहे.




