जळगावताज्या बातम्याधुळेनंदुरबारमहाराष्ट्रराष्ट्रीय-राज्यशासकीयसमस्या
नोंदणी विभागाची सेवा तीन दिवस राहणार बंद

जळगाव (प्रतिनिधी) : नोंदणी विभागाच्या सर्व्हरमध्ये तांत्रिक देखभाल व दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येत असल्यामुळे, १४ ऑगस्ट रात्री १२ वाजल्यापासून ते १७ ऑगस्ट रात्री १२ वाजेपर्यंत राज्यातील आय-सरीता प्रणाली अंतर्गत दस्तनोंदणीसह इतर सर्व अनुषंगिक सेवा बंद राहतील.
तरी संबंधित पक्षकार व दस्त नोंदणी करणारे व्यावसायिक यांनी याची नोंद घ्यावी, असे नोंदणी उपमहानिरीक्षक (मुख्यालय), महाराष्ट्र राज्य, पुणे उदयराज चव्हाण यांनी केले आहे.




