प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसह विद्यार्थ्यांनी उघडले म्युच्युअल फंडचे खाते

ऐनपूरच्या पटेल महाविद्यालयात ‘वित्तीय साक्षरता’ या विषयावर कार्यशाळा
ऐनपूर, ता.रावेर (प्रतिनिधी) : येथील सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालयात अंतर्गत गुणवत्ता समिती व अर्थशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘वित्तीय साक्षरता’ या विषयावर कार्यशाळा झाली. सुरुवातीला लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले.
या कार्यशाळेचे आणि अर्थाशास्त्र मंडळाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जे.बी. अंजने यांच्याहस्ते पार पडले. या कार्यशाळेत ज्ञानेश्वर बढे यांनी वित्तीय साक्षरता या विषयावर मार्गदर्शन केले. यात त्यांनी कमी वयात केलेली फायदेशीर गुंतवणूक, एस आय पी, म्युच्युअल फंड या विषयी सखोल मार्गदर्शन केले. तसेच प्राचार्य डॉ. अंजने यांनी पैसे कमविण्यापेक्षा तो टिकवता आला पाहिजे व त्यात दरवर्षी भर पडलीच पाहिजे असे सांगितले.
सूत्रसंचालन उपप्राचार्य डॉ. एस.एन. वैष्णव यांनी केले. आभार प्रदर्शन प्रा. हेमंत बाविस्कर यांनी केले. या कार्यशाळेत महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांचे म्युच्युअल फंडचे खाते उघडण्यासाठीच्या प्रक्रियेला सुरवात झाली. यशस्वीतेसाठी डॉ. जे. बी. अंजने यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. विलास पाटील, ज्ञानेश्वर कोळी, प्रा. हेमंत बाविस्कर, डॉ. जयंत नेहेते, डॉ. संदीप साळुंके व सर्व प्राध्यापक वृंद आणि कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.




