क्राईमताज्या बातम्या

पाळधीत पोलिसांची मोठी कारवाई; १६ जुगारी ताब्यात

जळगाव (प्रतिनिधी) : पाळधी येथे सुरू असलेल्या एका जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत १६ जुगारींना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून रोख रक्कम, मोबाईल फोन आणि जुगाराचे साहित्य असा एकूण १२ लाख २४ हजार २६० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

स्थानिक गुन्हे शाखा (LCB) आणि पाळधी दूरक्षेत्र येथील पोलिसांनी संयुक्तपणे ही कारवाई केली. एलसीबीचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वाखालील पोलीस उपनिरीक्षक शरद बागल यांच्या पथकाने या जुगार अड्ड्यावर छापा टाकला.

या कारवाईत पोलिसांनी ७ लाख २२ हजार २६० रुपये रोख रक्कम आणि वेगवेगळ्या कंपन्यांचे ५ लाख २ हजार रुपयांचे मोबाईल फोन हस्तगत केले आहेत. या प्रकरणी धरणगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यांनी केली कारवाई
या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक शरद बागल, हेड कॉन्स्टेबल अक्रम शेख, प्रवीण भालेराव, मुरलीधर धनगर, नितीन बाविस्कर, सलीम तडवी, विनोद पाटील, विजय पाटील, रविंद्र चौधरी, रविंद्र कापडणे, सिद्धेश्वर डापकर, राहुल रगडे, रतन गीते, मयुर निकम, भारत पाटील, महेश सोमवंशी, प्रमोद ठाकूर तसेच पाळधी दूरक्षेत्र येथील सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत कंडारे, अमोल धोबी आणि रविंद्र चौधरी यांचा सहभाग होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button