जळगावधार्मिकशैक्षणिक

शालेय परिसरात साजरे झाले रक्षाबंधन

ऐनपूर ता.रावेर (प्रतिनिधी) : ऐनपूर परिसर शिक्षण प्रसारक मंडळ संचालित सरदार वल्लभभाई पटेल पूर्व प्राथमिक व प्राथमिक विद्यामंदिर, ऐनपूर येथे सोमवारी रोजी रक्षाबंधनाचा कार्यक्रम पार पडला.

भाऊचे आपल्या जीवनात मोलाचे योगदान असते. त्यामुळे आपण बंधन म्हणून व त्याने आपले रक्षण करावे यासाठी आपण भावाला राखी ही बांधत असतो. असे राखीचे महत्त्व शाळेतील उपशिक्षिका निकिता चौधरी, कल्याणी शिंदे, जयश्री सराफ ,ममता पाटील यांनी विद्यार्थ्यांना सांगितले.

या कार्यक्रमाचे आयोजन शाळेचे मुख्याध्यापक अक्षय पाटील यांनी केले. तर याप्रसंगी विद्यार्थिनीनी घरून आपल्या भावासाठी बनवून आणलेल्या राख्या आपल्या बहिणी कडून मनगटावरती भाऊनी बांधून घेतल्या व त्यांना भेटवस्तू दिल्या. विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचे शाळेचे संचालक एन.व्ही.पाटील व व्यवस्थापक आर.टी.महाजन तसेच शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कौतुक केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button