
जळगाव (प्रतिनिधी): एस.एम.आय.टी. कॉलेज परिसरात नुकत्याच पार पडलेल्या रक्तदान शिबिरात महिलांनी उत्स्फूर्त रक्तदान केले.वुमेन्स अॅण्ड चाईल्ड केअर प्लस आणि आधार ज्येष्ठ नागरिक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शिबिरात एकूण १६ जणांनी रक्तदान केले. ६० वर्षांच्या सरला राजेंद्र सूर्यवंशी यांनी रक्तदान करून विद्यार्थ्यांनाही रक्तदानासाठी प्रेरित केले. यावेळी त्यांचे विशेष कौतुक करण्यात आले.
उद्घाटन सोहळ्याला इंडियन रेडक्रॉस सोसायटीचे चे चेअरमन डॉ. प्रसन्नकुमार रेदासनी, संचालक पुष्पात भंडारी, मंगला ठोंबरे, उषा शर्मा, तसेच संस्थेच्या अध्यक्ष व रेडक्रॉसच्या संचालक शांता वाणी आणि संभाजीराव देसाई (अध्यक्ष, आधार ज्येष्ठ नागरिक संघ) मंचावर उपस्थित होते.
दीपप्रज्वलनानंतर, शांता वाणी यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा सादर केला.डॉ. रेदासनी यांनी रक्तदानाचे महत्व विशद करताना सावली या नवीन उपक्रमाची माहिती दिली आणि ते जळगावात सुरु करणार असल्याचे सांगितले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हेमलता कुलकर्णी यांनी केले, तर शालिनी चौधरी यांनी आभार प्रदर्शन केले.