फैजपुरला तडवी हॉल सभागृहात जागतिक आदिवासी दिवस उत्साहात साजरा

फैजपूर (प्रतिपादन) : येथील तडवी हॉल व नगर पालिका सभागृहात ९ ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिवस तडवी भिल्ल बांधवांतर्फे उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी सामाजिक कार्यकर्ते आमद नशीर, बुऱ्हान कालू तडवी तसेच तडवी टायगर ग्रुपचे अध्यक्ष जमीर तडवी यांनी आदिवासी क्रांतीकारी महामानव बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन केले.
तडवी भिल्ल आदिवासी समाजाला महामानव बिरसा मुंडां यांच्या विचारावर व त्यांच्या केलेल्या कार्यावर पाऊल टाकून व यांच्या संस्कृती ची जनजागृती करणे आदिवासी समाजात महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन येथील तडवी टायगर ग्रुपचे अध्यक्ष जमीर तमीज तडवी व सामाजिक कार्यकर्ता बुऱ्हान कालू तडवी यांनी यावेळी सांगितले.
यावेळी आमद नशीर तडवी, महेबुब नामदार, नजीर बाबु, शरीफभासा तडवी, इकबाल (संजु)इस्माईल, प्रा. असलम हाजी बाबु, जलील अरमान, इस्माईल बाबु, शकील रफिक, जलील अरमान, आसिफ आमद, सलाउद्दीन मुबारक, जावेद सुलेमान, शकील रुबाब,मोहसीन तडवी भीम आर्मी, कालू नथु, राजु बिस्मिल्लाह, असलम नजीर,राजु हसन, बाबु सलीम,इब्राहिम कालू, टिपू तडवी, शकील रुबाब,इरफान तडवी आदिवासी तडवी भिल्ल बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सूत्रसंचालन सरफराज तडवी यांनी केले.




