जळगावमहाराष्ट्र

जळगावात उद्या पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा

जळगाव, (प्रतिनिधी) : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव आणि अरुणोदय ज्ञान प्रसारक मंडळ संचलित कला, वाणिज्य व गृहविज्ञान महिला महाविद्यालय, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

हा मेळावा “अरुणोदय ज्ञान प्रसारक मंडळ संचलित कला, वाणिज्य व गृहविज्ञान महिला महाविद्यालय, ख्वॉजामिया रोड, प्रगती शाळेच्या बाजुला येथे आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात 374 पेक्षा अधिक रिक्त पदांसाठी नामांकित कंपन्यांमध्ये भरती केली जाणार आहे. या रोजगार मेळाव्यात 10वी, 12 वी/ सर्व शाखेतील पदवीधारक / आ.टी.आय सर्व ट्रेड/ बी.ई/ बी.सी.ए./ एम.बी.ए तसेच सर्व डिग्री धारक पात्रता धारकासाठी 374 पेक्षा जास्त रिक्तपदे उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

जिल्हयातील जैन फॉर्म फ्रेश फुडस लि शिरसोली जळगाव, जैन इरिगेशन सिस्टीम प्रा.लि.बांभारी, दि.सुप्रिम इंडस्ट्रीज लि.गाडेगाव, गुजरात अंबुजा चाळीसगाव, उत्कर्ष स्मॉल बॅक जळगाव, जळगाव जनता सहकारी बॅक लि.जळगाव, खान्देश मोटर्स, जळगाव, छबी इलेक्ट्रीक.प्रा.लि.जळगाव, टी.के.प्रोसेसिग प्रा.लि अशा नामांकीत आस्थापनांकडे नोकरीची संधी उपलब्ध आहे.

उमेदवारांनी https://rojgar.mahaswayam.gov.in/#/home/index या पोर्टलवर लॉगिन करून संबंधित रिक्तपदांसाठी अर्ज करावा. ज्यांनी अद्याप नावनोंदणी केलेली नाही, त्यांनी आपली शैक्षणिक प्रमाणपत्रे व बायोडाटासह थेट मेळाव्याच्या दिवशी उपस्थित रहावे.

याबाबत काही अडचण असल्यास किंवा अधिक माहितीसाठी कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी (सकाळी 09.45 ते संध्या.06.15) या वेळेत कार्यालयाशी कार्यालयीन वेळेत दुरध्वनी क्रमांक 0257 – 2959790 वर संपर्क साधावा असे आवाहन संदिप ज्ञा. गायकवाड, सहायक आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, जळगाव यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button