जळगावताज्या बातम्यामहाराष्ट्रशेतकरी

फार्मर कप प्रशिक्षणासाठी शेतकरी रवाना; जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्याकडून हिरवा झेंडा

जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव तालुक्यातील कृषी विभाग व उमेद अभियानांतर्गत महिला व पुरुष शेतकरी पाणी फाउंडेशन आयोजित ‘फार्मर कप’ निवासी प्रशिक्षणासाठी के.व्ही.के. जळगाव जामोद सेंटर, जिल्हा बुलडाणा येथे रवाना झाले. या प्रशिक्षणाचा उद्देश शेतकऱ्यांना जलसंधारण, शाश्वत शेती पद्धती आणि ग्रामविकासाबाबत सखोल मार्गदर्शन करणे हा आहे.

प्रशिक्षणासाठी जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या बसला जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखविण्यात आला. यावेळी प्रोजेक्ट डायरेक्टर (DRDA) राजू लोखंडे, जिल्हा कृषी अधीक्षक कुरबान तडवी, उपविभागीय कृषी अधिकारी श्रीमती देसले, कृषी अधिकारी स्नेहल थेऊरकर, बीडीओ चंद्रकांत बोडरे, उमेद तालुका अभियान व्यवस्थापक देवेंद्र सुर्यवंशी तसेच पाणी फाउंडेशनचे विभागीय समन्वयक प्रल्हाद आरसुळे, उपविभागीय समन्वयक सुहास मोहिते, प्रियंका बैसाणे आणि तेजस निकुंभ आदी उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी घुगे यांनी शेतकरी बांधवांना शुभेच्छा देत ‘फार्मर कप’ प्रशिक्षणात सक्रिय सहभाग नोंदविण्याचे आवाहन केले. जलसंवर्धन आणि शाश्वत शेती पद्धतींचा अवलंब करून जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी पुढाकार घ्यावा, असेही त्यांनी नमूद केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button