ताज्या बातम्याक्रीडा

नीरजच्या अनुपस्थितीत यशवीरला संधी; आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय संघात मोठा बदल

जखमी नीरज चोप्राच्या जागी यशवीर सिंगची निवड; ७७ जणांच्या भारतीय ॲथलेटिक्स पथकाची घोषणा

आगामी आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय ॲथलेटिक्स संघात महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राला दुखापतीमुळे स्पर्धेतून माघार घ्यावी लागल्याने त्याच्या जागी यशवीर सिंगला भारतीय संघात स्थान देण्यात आले आहे.

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कांस्यपदक पटकावलेल्या यशवीरकडून आता आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतासाठी दमदार कामगिरीची अपेक्षा आहे. भारतीय ॲथलेटिक्स महासंघाने गुरुवारी लुधियाना येथे पत्रकार परिषद घेत ७७ सदस्यीय ट्रॅक अँड फील्ड संघाची अधिकृत घोषणा केली.

जपानमधील आयची-नागोया येथे १९ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबरदरम्यान आशियाई क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत भारताच्या ॲथलेटिक्स पथकाकडून पदकांची मोठी अपेक्षा आहे.

दरम्यान, लांब पल्ल्याचा धावपटू अभिषेक पाल याला कथित डोपिंग नियमभंगाच्या प्रकरणामुळे संघातून बाहेर करण्यात आले आहे. त्यामुळे भारतीय पथकात निवडीसोबतच काही महत्त्वाचे बदलही करण्यात आले आहेत.

आता जपानमध्ये यशवीरच्या भाल्याची कामगिरी किती लांब जाते, याकडे क्रीडाप्रेमींचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button