
फैजपुर (प्रतिनिधी) : जि.प. उर्दु मुलांची शाळा क्र.३ मध्ये २८ जुलै रोजी शासनाकडून विद्यार्थ्यांना मिळालेले गणवेश, बुट व पायमोजेचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे ज्येष्ठ सदस्य शेख अजीमुद्दीन शेख सरदार होते.
शेख साबिर शेख हसन व शेख मुशीर शेख साबिर यांच्या हस्ते सर्व विद्यार्थ्यांना मोफत गणवेश बुट व पायमोजे देण्यात आले. यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक सैय्यद मोहम्मद शफीक सैय्यद सिद्दीक अली तथा राज्य अध्यक्ष महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती व माजी स्विकृत संचालक ग.स. सोसायटी जळगाव यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमात ज्येष्ठ शिक्षक खलील पिंजारी, मोहम्मद आसिफ, शहजाद पटेल, तडवी अजहर, जुनैद सर, आसिफ अली सर, रोमान सर, काशिफ सर आदी उपस्थित होते.