
रावेर प्रतिनिधी : रावेर तालुक्यातील खिडी बु. येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर उत्सव समितीची बैठक आयोजित करण्यात आली. ही बैठक विश्वशांती बुद्ध विहार येथे पार पडली.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी माजी ग्रामपंचायत सदस्य जगदीश कोचुरे होते. यावेळी समितीची निवड करण्यात येऊन अध्यक्षपदी विकास जाधव, उपाध्यक्षपदी रतन कोचुरे तसेच सचिवपदी अॅड. मोहन कोचुरे यांची निवड करण्यात आली.
तसेच सहसचिव म्हणून ईश्वर ससाणे, खजिनदार म्हणून उमेश तायडे यांची निवड करण्यात आली. सल्लागार व सदस्य म्हणून गणेश देवगिरीकर, अॅड. शिवदास कोचुरे (ग्रामपंचायत सदस्य), मुकेश कोचुरे, अनिल जाधव, मिलिंद कोचुरे, गोपीचंद लाहासे, अनिल वानखेडे, संदीप कोचुरे, राज कोचुरे, गोकुळ कोचुरे, समाधान जाधव, विजय इंगळे, समाधान बोदळे, प्रविण सोनवणे, देवानंद जाधव, चंदू वाघ, सुनील कोचुरे, प्रविण धुंदले सर, दीपक कोचुरे, प्रदीप तायडे आदींसह अनेक नागरिक उपस्थित होते.
या बैठकीत जयंती उत्सव यशस्वी करण्याबाबत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.



